मनसेनंही घेतला कोरोनाचा धस्का...गुढीपाडवा मेळावा केला रद्द.. 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 March 2020

मुंबई - जगभरात कोरोनाने हातपाय पसरलेत. कोरोनाचं संकट महाराष्ट्र आणि भारतावर घोंघावतंय. अशात महाराष्ट्रात दररोज कोरोनाग्रस्त पॉझिटिव्ह केसेसची संख्या वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून मोठ्या प्रमाणात एका ठिकाणी जमू नका, गर्दीची ठिकाणं टाळा, असं सुचवण्यात आलंय. याच कोरोनाचा फटका आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बसलेला पाहायला मिळतोय. कोरोनाच्या सावटामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आता रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा: ३१ मार्चपार्यंत महाराष्ट्रातील ४ मोठी शहरं बंद राहणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील मोठा तरुणवर्ग कायम उत्सुक असतो. अशात राज ठाकरे यांच्या सभा आणि प्रचंड गर्दी हे समीकरण कायमचंच आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यासाठी घेण्यात येणाऱ्या बैठका आणि मेळावे यासाठी देखील मोठी गर्दी होते. अशात यंदाचा गुढीपाडवा मेळावा कसा घ्यायचा हा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसमोर होता. दरम्यान नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेता यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द करण्याचा निर्णय मनसेकडून घेण्यात आलाय. यासंदर्भातील परिपत्रक काढत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माहिती दिली आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरकारला प्रश्न:

महाराष्ट्रातील केवळ काही शहरातील शाळा बंद ठेवणं कसं पुरणार? असा सवाल मनसेने या पत्रकाच्या माध्यमातून केलाय. मुंबईसारखं शहर हे प्रचंड गर्दीचं शहर आहे. अशात मुंबईत प्रचंड गर्दीच्या लोकलमधून नागरिकांना प्रवास करावा लागतो. याचसोबत बसेस आणि मार्केट परिसरात देखील प्रचंड गर्दी असते. या परिस्थिती सरकार काय करणार असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. अनेक नागरिक रोजंदारीवर काम करत असतात, अशात रोजंदारीवर काम करणाऱ्यांसाठी काय करणार असा सवाल देखील या पत्रकाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलाय. यासोबतच महाराष्ट्रात येत्या काळात निवडणूक येऊ घातल्यात. त्याबाबत काय निर्णय घेणार असाही सवाल मनसेने उपथित केलाय.

हेही वाचा: ...'हे' घेऊन फिरू नका,पोलिस करतील कारवाई..

लवकरात लवकर महाराष्ट्रावरील कोरोनाचं संकट आणि महाराष्ट्रावरील आर्थिक संकट दूर व्हावं अशी प्रार्थना मनसेकडून आई जगदंबेचरणी करण्यात आलीये.

MNS cancelled their gudhipadwa melava in mumbai because of corona virus

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS cancelled their gudhipadwa melava in mumbai because of corona virus