

Raj Thackeray Birthday Social Media Post
ESakal
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस १४ मे रोजी असतो. पण यावर्षी त्यांनी वाढदिवसापूर्वी आपल्या समर्थकांना एक विशेष आवाहन केले आहे. यावर्षी आपण मुंबईत उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे समर्थकांनी लोकसेवा करून आपला वाढदिवस साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.