esakal | सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर राज ठाकरेंचा 'मोठा' खुलासा, स्वतः काही गोष्टी केल्यात क्लियर...
sakal

बोलून बातमी शोधा

सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर राज ठाकरेंचा 'मोठा' खुलासा, स्वतः काही गोष्टी केल्यात क्लियर...

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली. सुशांत सिंग राजपूत याच्या हत्येनंतर बॉलिवूडमध्ये नवख्या कलाकारांचा प्रचंड छळ केला जातो अशी चर्चा सुरु झाली.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणावर राज ठाकरेंचा 'मोठा' खुलासा, स्वतः काही गोष्टी केल्यात क्लियर...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सोशल मीडियावर सुशांत सिंग राजपूतबद्दल आणि त्याच्या आत्महत्येबद्दल अनेक वावड्या देखील उठल्यात. अशात स्वतः महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी बॉलिबूडमधील अनेक बड्या हस्तींची नावं समोर येतायत आणि आम्ही त्या सर्वांची कसून चौकशी करू असं म्हटलंय.

अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सुशांतच्या आत्महत्येबाबतची एक भूमिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय. मनसेच्या या भूमिकेमुळे बॉलिवूडमध्ये मोठ्या चर्चा देखील रंगल्यात. काहीजणांकडून याचं समर्थन देखील केलं जातंय. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः मोठा खुलासा केलाय. 

इथे मिळेल नोकरी! #MMRDA च्या भरतीसाठी 6 जुलैपासून ऑनलाईन रोजगार मेळावा; असं करा अप्लाय..

आधी जाणून घेऊयात काय आहे व्हायरल पोस्ट 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली. सुशांत सिंग राजपूत याच्या हत्येनंतर बॉलिवूडमध्ये नवख्या कलाकारांचा प्रचंड छळ केला जातो अशी चर्चा सुरु झाली. दरम्यान कुणाही नवोदित कलाकाराला कोणताही छळ झाल्यास कलाकारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे संपर्क साधावा. आम्ही त्या कलाकारांना न्याय मिळवून देऊ अशा आशयाची ही पोस्ट होती. 

राज ठाकरे म्हणतात : 

यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः ट्विट करून भाष्य केलंय. राज ठाकरे म्हणतात, " सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक गोष्टी व्हायरल होतायत.  अनेक प्रकारच्या वावड्या उठतायत. अशा बातम्यांसोबत किंवा उठणाऱ्या वावड्यांसोबत कुणीतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव जोडलंय. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष किंवा पक्षाची कोणतीही विंग या कॉंट्रोव्हर्सी किंवा बातम्यांमध्ये सामील नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी." 

कोरोनाचा वाढता संसर्ग; ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ आता 'या' तालुक्यातही संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा...

सध्या महाराष्ट्र पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूत प्रकरणात कसून तपास केला जातोय. 

mns chief raj thackeray clarifies one big thing about sushant singh rajput