esakal | कोरोनाचा वाढता संसर्ग; ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ आता 'या' तालुक्यातही संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा...
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown

राज्यात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर मुंबई, पुण्यातून मोठ्या संख्येने नागरिक ग्रामीण भागात गेले. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला.

कोरोनाचा वाढता संसर्ग; ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ आता 'या' तालुक्यातही संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

महाड (बातमीदार) : मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुन्हा एकादा संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. सुरुवातीला केवळ शहरी भागापुरता मर्यादित असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागातही पसरला आहे. त्यामुळे अनेक तालु्क्यातही लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येत आहे.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; वीज बिलांबाबत बेस्ट उपक्रमाने घेतला महत्वाचा निर्णय...

राज्यात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर मुंबई, पुण्यातून मोठ्या संख्येने नागरिक ग्रामीण भागात गेले. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. त्यातही महाड तालुक्यात कोरोनाचे प्रमाण बरेच वाढले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महाड शहर आणि तालुक्यात कोरोनाचा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोमवार 6 जुलै ते सोमवार 13 जुलैपर्यंत दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय आज सर्वपक्षीय बैठकीत आज घेण्यात आला. 

लॉकडाऊनचा रेल्वेला मोठा आर्थिक फटका; तब्बल इतक्या कोटींचा झाला तोटा

या बैठकीला आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिक जगताप,  प्रांताधिकारी विठ्ठल इमानदार , नगराध्यक्षा स्नेहल जगताप, पंचायत समिती सभापती ममता गांगण , तहसीलदार चंद्रसेन पवार, पोलिस निरीक्षक शैलेश सणस, नगर पालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील तसेच व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

हवामान विभागाचा रेड अलर्ट! अऱबी समुंद्रात येणार एवढ्या उंचीच्या लाटा

लॉकडाऊनच्या या काळात औषधांची दुकाने पुर्णवेळ तर दुग्धव्यवसाय सकाळी 7 ते सकाळी 10 वाजेपर्यंत खुली राहतील.  गेल्या दोन तीन दिवसांत महाड शहर आणि तालुक्यांतील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षांत घेऊन वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रांताधिकारी विठ्ठल इमानदार यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. 

मोठी बातमी - UBER ने मुंबई ऑफिस केलं बंद, मात्र ग्राहकांना कंपनी म्हणतेय...

यावेळी आमदार भरत गोगावले आणि माणिक जगताप यांनी महाड तालुक्यातील व्यापारी दुकानदार आणि नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. उपस्थित व्यापारी नागरीक यांचे म्हणणे ऐकून  घेतल्यानंतर प्रांताधिकारी इमानदार यांनी महाड तालुका आणि शहर आठ दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जाहिर केला