माझा देश धर्मशाळा वाटली का?; राज ठाकरेंचा आझाद मैदानावरून सवाल

टीम ई-सकाळ
Sunday, 9 February 2020

राज ठाकरे म्हणाले, 'देशात अनेक प्रश्न आहेत. पिण्याच्या पाण्याचा, शिक्षणाचा प्रश्न आहे. मला मान्य आहे. पण, माझा देश म्हणजे धर्मशाळा वाटली का? दरवेळी 
भारतानं माणूसकीचा ठेका घेतलेला नाही.'

मुंबई : हिंदुत्वाची कास धरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज मुंबईत भव्या मोर्चा काढला. पाकिस्तानी, बांग्लादेशींनो चले जाव, अशी घोषणा देत मुंबईत हिंदू जिमखाना ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व केलेले पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे आझाद मैदानावर छोटेखानी भाषण झाले. त्यात त्यांनी पाकिस्तान आणि बांग्लादेशातून आलेल्या मुस्लिमांना हाकललेच पाहिजे, अशी भूमिका मांडली. कधी तरी ही साफसफाई केलीच पाहिजे, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतातल्या घुशी घालवा
राज ठाकरे म्हणाले, 'देशात अनेक प्रश्न आहेत. पिण्याच्या पाण्याचा, शिक्षणाचा प्रश्न आहे. मला मान्य आहे. पण, माझा देश म्हणजे धर्मशाळा वाटली का? दर वेळी भारतानं माणूसकीचा ठेका घेतलेला नाही. युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका सगळीकडे ही कारवाई सुरू आहे. तिथं असे निर्वासित सापडले तर 'तुला तुझ्या देशात परत पाठवतो किंवा जेल तुम्ही पर्याय निवडा.' असे सांगितले जाते. बाकीचे देश सुतासारखे सरळ होत आहेत. आता भारतानं कठोर भूमिका घ्यायला हवी. भूसभूशीत जमीन असली की तिथं घुशी होता. या घुशी घालवण्यासाठी भारतानं कधी तरी कडक व्हायलाच हवं. मराठी मुस्लिम राहतात तिथं कधीच दंगली झालेल्या नाहीत. कारण ते आपल्याच देशातील आहेत.'

राज्य सरकारला सांगण्यात काही अर्थ नाही. केंद्राला सांगितलं पाहिजे की, महाराष्ट्रात पोलिसांचे हात फक्त 48 तास रिकामे करा. राज्यातलं गुन्ह्याचं प्रमाण ते कमी करून देतील, असा विश्वास मला वाटतो.
- राज ठाकरे, अध्यक्ष मनसे

आणखी वाचा - मनसेच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा; कोणी केली घोषणा

पोलिसांवर येतो दबाव
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात यापूर्वी आझाद मैदानावर काढलेल्या मोर्चाची आठवण करून दिली. ते म्हणाले, 'देशातील अनागोंदीचं प्रेशर पोलिस खात्यावर येतं. याच पोलिस बांधवांसाठी मी आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. पोलिस महिलांवर त्यांनी हात टाकला होता. तुमच्यावर हात टाकायला किती वेळ लागेल. यांचा आताच बंदोबस्त करायला नको का?' केंद्रानं पोलिसांना 48 तास रिकामे हात द्यावेत. ते राज्यातली गुन्हेगारी कमी करतील, असं मतही राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns chief raj thackeray speech azad maidan against pakistani muslim