'मुख्यमंत्री वैचारिकदृष्ट्या दुष्काळी'

raj thackrey
raj thackrey

मंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वैचारिकदृष्ट्या दुष्काळी असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या नव्या व्यंगचित्रातून केली आहे. राज यांनी आज त्यांचे नवे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. राज यांनी नेहमीप्रमाणेच खास आपल्या शैलीतून फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

राज यांनी पुढचा मुख्यमंत्री मीच होणार, या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे एक महाराष्ट्राची अर्थिक परिस्थिती नावाची मोठी होडी काढून त्यात मुख्यमंत्र्यांना झोपल्याचे चित्र दाखवले आहे. विशेष म्हणजे, ती होडी कोरड्या जमिनीवर खोल पाण्यात बुडाल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याचे राज यांनी आपल्या चित्रात दर्शवले आहे. तर मुख्यमंत्र्यांकडे वैचारिक दुष्काळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

1 लाख 20 हजार विहिरी, हागणदारी मुक्त महाराष्ट्र, इतर थापा असं लिहिलेल्या कागदपत्रांवर फडणवीस पाय ठेवून झोपल्याचे या व्यंगचित्रात दिसत आहे. तसेच, बाजूलाच होडीला टेकून अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार उभारले आहेत. तसेच राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीवर भाष्य करताना, 201 तालुक्यात दुष्काळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

पुढचा मुख्यमंत्री मीच होणार, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. राज यांनी फडणवीसांच्या या विधानाची खिल्ली उडवत, परंतु देवेंद्रजी पुन्हा लाट येईल असे वाटत नसल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या मनात हा प्रश्न असल्याचे राज यांनी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून दाखवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com