esakal | मनसेच्या आंदोलनात मुंबईचे डबेवाले; लोकलनं प्रवास करु द्या, डबेवाल्यांची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

मनसेच्या आंदोलनात मुंबईचे डबेवाले; लोकलनं प्रवास करु द्या, डबेवाल्यांची मागणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे सभा सुरू करावी यासाठी सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला मुंबई डबेवाला असोशिएशननं पाठिंबा दर्शवला आहे. 

मनसेच्या आंदोलनात मुंबईचे डबेवाले; लोकलनं प्रवास करु द्या, डबेवाल्यांची मागणी

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  सर्वसामान्यांना लोकल सेवा सुरू करावी यासाठी मनसे सविनय आंदोलन करत आहे.  मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी लोकलनं प्रवास करून आंदोलन केलंय. लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा ठप्प आहे. आता मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. संदीप देशपांडे यांनी सकाळीच लोकलमधून विनापरवानगी लोकल प्रवास केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे सभा सुरू करावी यासाठी सविनय कायदेभंग आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला मुंबई डबेवाला असोशिएशननं पाठिंबा दर्शवला आहे. 

मुंबईत अनेक कार्यालय सुरु झाली आहेत. त्यामुळे डब्बे पोहोचवण्यासाठी रेल्वेची सुविधा सुरु व्हावी अशी मागणी डबेवाला असोशिएशनकडूनही करण्यात आली होती. लोकल सेवा बहाल करा अन्यथा मुंबईच्या डबेवाल्यांची जेवणाचे डबे पोहोचवण्याची सेवा अत्यावश्यक सेवा मानून डबेवाल्याला लोकलने प्रवास करू देण्यात यावास अशी मागणी दोन महिन्यांपूर्वी मुंबई डबेवाला असोशिएशननं रेल्वे प्रशासनाकडे केली होती. मात्र आता दोन महिने झाले तरी रेल्वे प्रशासनाकडून कोणताच निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही आहे. 

अधिक वाचाः  मनसेचे डोंबिवलीत आंदोलन, स्थानकाबाहेरचं पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवलं

रेल्वे प्रशासनाने लोकलनं प्रवास करण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा अन्यथा मनसेप्रमाणे मुंबई डबेवाला असोशिएशनला लोकलने प्रवास करून सविनय कायदेभंग करावा लागेल अशा शब्दात सरकारला इशारा देण्यात आला आहे. तसंच केंद्र सरकार आणी रेल्वे प्रशासनाने आमची अडचण समजून घ्यावी आणि डबेवाल्यांची सेवा आत्यावश्क सेवा मानून डबेवाल्यांना लोकलने प्रवास करू देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचाः  मनसेच्या सविनय आंदोलनाला सुरुवात, संदीप देशपांडेंचा लोकल प्रवास, अविनाश जाधव ताब्यात
 

मनसेचं आंदोलन

ठाणे स्टेशनवर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना लोकल प्रवास करण्याआधीच पोलिसांनी अडवलं आणि कार्यकर्त्यांसह ताब्यात घेतलं. ठाण्यात पोलिसांचा मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आलाय.  मुंबईतील लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी मनसेने केली होती. सर्वच रेल्वे स्थानकावर कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र तरी सुद्धा संदीप देशपांडे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लोकलमधून प्रवास केला आहे. 

सविनय कायदेभंगाच्या इशाऱ्यानंतर संदीप देशपांडे यांना रेल्वे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. दादर रेल्वे पोलिस स्टेशन आणि मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी संदीप देशपांडे यांना ही नोटीस पाठवली आहे. रेल्वेने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचं या नोटीसमध्ये लिहिलं आहे. मात्र तरीही संदीप देशपांडे यांनी काही कार्यकर्त्यांसह लोकलमधून प्रवास केला.

MNS civil disobedience protest mumbai dabewala support