मनसेने काढले नवे टी-शर्टस्; 'बॅन ईव्हीएम'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

राज ठाकरेंच्या ईडी चौकशीनंतर मनसे ने आपला मोर्चा पुन्हा एकदा ईव्हीएमकडे वळवला आहे.भांडुप विधानसभा क्षेत्रात मनसेने 'नको ईव्हीएम' नावाची टी-शर्टसच वाटप करून ईव्हीएम विरोधातील आपला लढा पुन्हा सुरू केला.

मुंबई : राज ठाकरेंच्या ईडी चौकशीनंतर मनसे ने आपला मोर्चा पुन्हा एकदा ईव्हीएमकडे वळवला आहे.भांडुप विधानसभा क्षेत्रात मनसेने 'नको ईव्हीएम' नावाची टी-शर्टसच वाटप करून ईव्हीएम विरोधातील आपला लढा पुन्हा सुरू केला.

मनसेचे भांडुप विधानसभा अध्यक्ष संदीप जळगांवकर यांनी 'नको ईव्हीएम' ही मोहीम सुरू केली आहे.जळगांवकर यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात 5 हजार टी-शर्टसचं वाटप केलं.'नको ईव्हीएम','मतदान बॅलट पेपरवरच घ्या' अश्याआ प्रकारचे संदेश या टी-शर्टसवर आहेत.

ईडी चौकशीनंतर राज ठाकरे यांनी 'माझी कितीही चौजाशी केली तरी मी तोंड बंद ठेवणार नाही' अशी भूमिका घेतली आहे.यामुळे मन सैनिकांना पुन्हा एकदा स्फुरण चढलं असून त्यांनी सत्ताधाऱ्यांशी दोन हात करण्याची तयारी सुरू केली आहे.मनसे ईव्हीएमचा विरोधात असून 'नको ईव्हिएम' ची ही मोहीम तीव्र करणार असल्याचे संदीप जळगांवकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS Creates New T Shirt is BAN EVM