MNS Deepotsav Controversy : ‘’दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत, हे दाखवण्यापर्यंत सरकार...’’ ; मनसेचा आरोप!

Maharashtra Navnirman Sena criticize Tourism Department : जाणून घ्या, पर्यटन विभागाने दीपोत्सवाबाबत असं काय म्हटलंय, ज्यावरून मनसे चिडली आहे?
MNS criticize the Maharashtra Tourism Department for allegedly taking undue credit for organizing the Diwali Deepotsav event.

MNS criticize the Maharashtra Tourism Department for allegedly taking undue credit for organizing the Diwali Deepotsav event.

esakal

Updated on

सध्या सर्वजण दिवाळीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दीपोत्सवाचे आयोजन केले गेले होते. मात्र आता या दीपोत्सवाचे श्रेय घेण्याचा राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून प्रयत्न झाल्याचा आरोप मनसेकडून केला गेला आहे.

याला कारण, महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाकडून मुंबईतील दिवाळीसंदर्भात काही पोस्ट शेअर केल्या गेल्या आहेत. ज्यामधअये “दिवाळीची ‘जादू’ पाहायला चला! तुम्ही जर अजूनही छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा ‘दीपोत्सव’ पाहिला नसेल, तर मुंबईचा सर्वात शानदार ‘प्रकाशमय’ दीपोत्सव तुमच्याकडून मिस होत आहे”, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. एवढंच नाहीतर यासोबत mtdc च्या वेबसाईटची लिंकदेखील देण्यात आली आहे. या दीपोत्सवासोबतच मुंबईतील रोषणाई अनुभवण्यासाठी इथे येण्याचं नागरिकांना आवाहनही पर्यटन विभागाकडून करण्यात आलं आहे. मात्र पर्यटन विभागाच्या या पोस्टमध्ये मनसेचा कुठेही उल्लेख दिसत नाही. यामुळे मनसेने यावर आक्षेप घेत, आरोप केले आहेत.

मनसेने याबात एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘’महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्यांच्या एक्स हॅण्डलवरून, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील 'दीपोत्सवाची' काही क्षणचित्रं दाखवून पुढे हा अनुभव घ्यायला या असं मुंबई आणि मुंबई बाहेरील पर्यटकांना असं आवाहन केलं आहे... दिवाळी हा हिंदूंचा सगळ्यात मोठा सण आणि या सणाच्या निमित्ताने गेली १३ वर्ष दीपोत्सव हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवाजी पार्क मैदानावर करत आहे... हा दीपोत्सव जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत असली तरी तो पूर्ण अराजकीय राहील हे आम्ही पाहिलं आणि आमचा उद्देश फक्त आणि फक्त लोकांना आनंद मिळावा हाच आहे आणि राहील...’’

MNS criticize the Maharashtra Tourism Department for allegedly taking undue credit for organizing the Diwali Deepotsav event.
Tejashwi Yadav News : बिहारमध्ये निवडणुकीआधीच तेजस्वी यादव यांना एक नाहीतर तीन मोठे धक्के!

‘’पण जेंव्हा महाराष्ट्र सरकारचा एक विभाग या दीपोत्सवाचं मार्केटिंग हे स्वतः हा विभाग करत असल्यासारखं जेंव्हा दाखवतं तेंव्हा विशेष आश्चर्य वाटलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचं अगदी छोटंसं श्रेय दिलं असतं तर निश्चित आम्हाला आनंद झाला असता आणि सरकारच्या मनाचा उमदेपणा दिसला असता... नाशिकमध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे केलं ते पुढे तत्कालीन सरकारनेच केलं अशी जाहिरातबाजी झाली.. असो.. पण तुमचे नेते ते आमचे नेते, तुमचा पक्ष आमचा पक्ष अशी कार्यपद्धती सत्ताधारी पक्षाची आहे हे दिसतंच आहे. पण आता दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हते ! असो . . .’’

MNS criticize the Maharashtra Tourism Department for allegedly taking undue credit for organizing the Diwali Deepotsav event.
Siddaramaiah Latest News : सिद्धरामय्या घेताय राजकारणातून निवृत्ती? ; मुलाच्या विधानाने कर्नाटकातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

‘’आम्ही मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एक अभिजात कार्यक्रम यावर्षी केला, दीपोत्सव तर असतोच, असे सामान्यांना आनंद देणारे अनेक उपक्रम आम्ही करत राहणार आहोतच. त्यावेळी देखील पर्यटन विभागाला ते आमचे आहेत म्हणण्याचा मोह होईल इतके ते छान करूच, फक्त त्यावेळेस त्याचं श्रेय आमच्या पक्षाला जरूर द्या म्हणजे झालं!!!’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com