मनसे उरली दादरपुरतीच... 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप बहुमताचा दावा करत मुंबईवर झेंडा फडकवण्याची स्वप्ने बघत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र केवळ दादरपुरतेच स्वत:ला मर्यादित करीत दादर जिंकण्याचाच ध्यास घेतला आहे. यामुळे पक्षाच्या कक्षा दादरपुरत्याच आकसून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात बुधवारी होती. 

दादरच्या मुख्य गडकरी चौकात शिवसेना भवनाच्या दिशेने लावलेला बॅनर नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. "एकच ध्यास दादरचा विकास...अजूनही वेळ गेली नाही. एकच निवड...' असा मजकूर असलेल्या या बॅनरने मनसेची राजकीय झेप स्पष्ट केली. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना, भाजपने आघाडी घेतलेली असताना मनसेने मात्र अद्याप आपला प्रचाराचा नारळही फोडलेला नाही. प्रचारासाठी जेमतेम बारा दिवस शिल्लक असल्याने राज ठाकरे अद्याप प्रचारात उतरत नसल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत. 
गेल्या दोन मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या मतांवर डल्ला मारणाऱ्या मनसेने या वेळी मात्र अद्याप सावध भूमिका घेतली आहे. युती करण्यासाठी हात पुढे करणाऱ्या मनसेला शिवसेनेने नाकारल्यानंतर पक्ष अद्याप सावरलेला नाही. 2012 च्या महापालिका निवडणुकीत 28 नगरसेवक निवडून आणणारी मनसे या निवडणुकीत मात्र आकसल्याची लक्षणे दिसत आहेत. 

राज यांचा प्रचार दौरा लवकरच 
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा प्रचार दौरा लवकरच सुरू होणार आहे. राज यांच्या दौऱ्याचा तपशील निश्‍चित करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी प्रचारात आघाडी घेणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभा अद्याप सुरू न झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. 

Web Title: mns in dadar