मुंबईतील वांद्रे परिसरात मनसेकडून बॅनरबाजी

MNS-banners
MNS-banners

मुंबई : ईडी चौकशीनंतर कृष्णकुंजवर परतलेल्या राज ठाकरे यांनी "माझी कितीही चौकशी केली तरी तोंड बंद ठेवणार नाही" असा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला. यानंतर मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला असून त्यांनी मुंबईतील वांद्रे परिसरात राज ठाकरेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली आहे.

'नही रुकेगा, नही झुकेगा', #ISupportRajThakeray असा मजकूर असणारे बॅनर वांद्रे परिसरातील रस्त्यांवर आणि चौकात लावण्यात आले आहेत. अखिल चित्रे या मनसैनिकाने हे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर पेंटिंगचा ब्रश आणि माईकचे चित्र ही आहे. राज ठाकरे हे आपल्या व्यंग्य चित्रातून आणि भाषणातून कुठल्याही दबावात न येता आपली भूमिका मांडतील आणि सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढतील असा इशारा यातून देण्यात आला आहे.

"मी त्यांना सांगून आलोय, मला कितीही प्रश्न विचारा. माझी कितीही चौकशी केली तरी तोंड बंद ठेवणार नाही" अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी ईडी चौकशीनंतर आपल्या कार्यकर्त्यांशी बोलतांना दिली. यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून त्यांनी बॅनरबाजीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना जश्यास तसे उत्तर द्यायला सुरुवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com