

MNS Leader Join BJP
ESakal
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या संभाव्य युती आणि जागावाटपाच्या चर्चेला वेग आला असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सरोज भोईर आणि माजी नगरसेवक सुदेश चुडनाईक यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उमेशनगर मैदानात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.