मनसेकडून बांगलादेशी नागरिक पोलिसांच्या स्वाधीन 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 February 2020

घोडबंदर रोडवरील किंग काँग नगरमधील घटना

ठाणे : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या अधिवेशनात "बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना शोधा आणि हाकला' या आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर ठाण्यातील मनसैनिकांनी बांगलादेश शोधमोहीम सुरू केली.

हेही वाचा - म्हणून खेळणेविक्रेते करणार आंदोलन

गुरुवारी मनसेच्या ठाण्यातील कार्यकर्त्यांनी घोडबंदर रोडवरील किंगकॉंगनगरमध्ये राहणाऱ्या तीन बांगलादेशी परिवारांना शोधून काढले आणि कासारवडवली पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती ठाणे मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिली. 

महत्त्वाची बातमी - कोरगाव भीमा तपास प्रकरणी महाविकास आघाडीत फूट?

घोडबंदर रोडवरील किंगकॉंगनगरमध्ये 50 बांगलादेशी परिवार राहत असल्याची माहिती मिळताच मनसैनिकांनी ही शोधमोहीम सुरू केली. जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिमेत तीन परिवार बांगलादेशी असल्याचे आढळले. त्यांना कासारवडवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. याबाबत कासारवडवली पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता, मनसैनिकांनी त्यांना संशयावरून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी सध्या सुरू असल्याची माहिती ठाणे अंमलदारांनी दिली. 

या परिसरात आणखीही बांगलादेशी परिवार राहत असून त्यांचा लवकरात लवकर शोध पोलिसांनी घ्यावा. - रवींद्र मोरे, ठाणे शहर अध्यक्ष, मनसे 
 

 
 

 

web title : MNS handed over to Bangladeshi civilian to police


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS handed over to Bangladeshi civilian to police