... म्हणून खेळणी विक्रेते करणार आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

60 टक्के आयात शुल्काविरोधात केंद्र सरकारविरोधात नाराजी

मुंबई : खेळण्यावरील आयात कर 20 टक्‍क्‍यांवरून 60 टक्के करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मुंबईतील खेळणी विक्रेत्यांनी विरोध केला आहे. या वाढीव आयात शुल्काविरोधात खेळणी विक्रेत्या संघाची बैठक होणार असून सोमवारी याविरोधात बंद पुकारला जाण्याची शक्‍यता आहे. यात फक्त विक्रेत्यांचे नुकसान नसून ग्राहकांनाही महागडी खेळणी परवडणारी नाहीत, असा दावा विक्रेते करत आहेत.

मोठी बातमी गृहमंत्रालयाकडून मुंबई कमिशनर संजय बर्वेंना समन्स, जाणून घ्या 'संपूर्ण' प्रकरण...

केंद्र सरकारने खेळण्यावरील आयात शुल्क 2017 मध्ये 10 टक्‍क्‍यांवरून वाढवून 20 टक्के केला. त्यानंतर अवघ्या दोन वर्षातच म्हणजे हे शुल्क 60 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे खेळण्याच्या किमती 40 टक्‍क्‍याहून अधिक वाढण्याची शक्‍यता आहे. भारतात तब्बल 85 टक्के खेळणी ही आयात होतात. तर,15 टक्के खेळणी भारतात बनवली जातात. त्यामुळे या निर्णयाचा फटका ग्राहकांबरोबरच व्यापाऱ्यांनाही बसणार आहे, असा दावा युनायटेड टॉईज असोसिएशनचे प्रतिनिधी अब्दुला शरीफ यांनी केला. मुलांच्या मानसिक विकासाठी खेळणीही आवश्‍यक आहेत. खेळणीही शैक्षणिक साधन असल्याने ही आयात शुल्कवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा  'हे' ११ नगरसेवक करणार राष्ट्रवादीत घरवापसी; गणेश नाईकांना मोठा धक्का.. 

मेड इन इंडियाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असला तरी सध्या त्याचा परिणाम थेट व्यवसायावर होईल, असाही दावा करण्यात येत आहे. सध्या या उद्योगाला चालना देण्यासाठी पोषक वातावरण नाही. त्यामुळे या निर्णयचा विक्रेत्यांवरच थेट परिणाम होईल. याबाबत उद्या (ता. 13) संघटनेची बैठक होणार असून त्यानंतर सोमवारी बंद करायचा की नाही याबाबत निर्णय होईल, असेही सांगण्यता आले.

धक्कादायक चेंजिंग रुममध्येच तिने बसवला 'तिसरा डोळा' आणि म्हणाली 'ड्रेस ट्राय करो'...

- देशभरात - 2 हजार 500 कोटीची उलाढाल 
- मुंबईत - 400 कोटीहून अधिक उलाढाल 
- मुंबईत फक्त खेळण्याची दुकाने - किमान 1 हजार 
- आयात खेळणी - 85 टक्के 
- चीनमधून त्यातील - 75 टक्के

... then the toy vendors will protest


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ... Then the toy vendors will protest