मनसेने आळवला 27 गावांच्या स्वतंत्र पालिकेचा राग 

केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांना पुष्पगुच्छ देताना मनसे आमदार प्रमोद पाटील
केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांना पुष्पगुच्छ देताना मनसे आमदार प्रमोद पाटील

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत 2015 मध्ये 27 गावांचा समावेश करण्यात आला होता. मात्र या परिसरातील ग्रामस्थांनी या निर्णयाला सातत्याने विरोध केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची घोषणाही केली होती. परंतु चार वर्षे उलटून गेल्यानंतरही याबाबत कोणतीही प्रगती झालेली नाही. पुढील वर्षी होणाऱ्या कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीपूर्वी सरकारने या गावांची पालिका स्थापन करून दोन्ही निवडणुका एकत्र घ्याव्यात, अशी मागणी मनसेचे नवनिर्वाचित आमदार प्रमोद पाटील यांनी केली. 

कल्याण-डोंबिवली शहरांमधील नागरिकांना रस्ते, पूल, फेरीवाले यामुळे होत असलेल्या गैरसोयींकडे मनसेचे नवनिर्वाचित आमदार प्रमोद पाटील यांनी आयुक्त गोविंद बोडके यांचे लक्ष वेधले. पाटील यांनी निवडणूक निकालानंतर प्रथमच पालिका आयुक्तांची भेट घेत या समस्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मनसेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, कल्याण पश्‍चिमचे माजी आमदार प्रकाश भोईर, संघटनेचे पदाधिकारी इरफान शेख, मनसे गटनेते मंदार हळबे या वेळी उपस्थित होते. 

मनसेने फेरीवाल्यांच्या संदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेबाबतही या वेळी आयुक्तांना माहिती देण्यात आली. गुरुवारी पालिका प्रशासनाने रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईमध्ये सातत्य ठेवण्याच्या सूचना केल्या. शहरातील विविध समस्यांकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पत्री पुलाचे काम रेल्वे आणि पालिका प्रशासन यांच्या माध्यमातून होणार आहे. या कामात योग्य ती गती राखली जात नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केला. या संदर्भात आपण संबंधित यंत्रणांच्या भेटीगाठी घेऊ, असेही ते म्हणाले. 27 गावांसाठी स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबत देण्यात आलेले आश्वासन विचारात घेता, पुढील वर्षीच्या कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीबरोबरच या नवीन पालिकेच्या निवडणुका घेतल्या जाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com