esakal | अमित ठाकरे उद्या कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर | MNS
sakal

बोलून बातमी शोधा

raj thackeray, amit thackeray

अमित ठाकरे उद्या कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली: सध्या राज्यात खड्ड्यांचा प्रश्न (Pothole issue) पेटला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते उद्या कल्याण-डोंबिवलीच्या (Kalyan-dombivali) दौऱ्यावर येणार आहेत. मनसेचे युवा नेते अमित राज ठाकरे (Amit thackeray) उद्या आणि परवा कल्याण-डोंबिवलीचा दौरा करणार आहेत. अमित ठाकरे पुणे, नाशिक नंतर आता कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर येत आहेत. येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे.

अमित ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरक कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि कल्याण मध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरु आहेत. अमित ठाकरें सोबत मनसे नेते बाळा नांदगावकर , नितीन सरदेसाई , शिरीष सावंत , अविनाश अभ्यंकर, संजय नाईक उपस्थित राहणार आहेत. फेब्रुवारी मध्ये होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे पिता पुत्रांनी पक्षबांधणीसाठी शहरे पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे दौरा केला तर पुत्र अमित ठाकरे यांनी नाशिकचा दौरा केला. पुणे नाशिक नंतर मनसेचे बडे नेत्यांनी कल्याण डोंबिवलीचा दौरा फिक्स केला आहे. 1 ते 3 ऑक्टोबर कालावधीत मनसे नेते कल्याण डोंबिवलीत येत आहेत.

हेही वाचा: भाजपमध्ये जाणार नाही पण काँग्रेसमध्ये थांबणार नाही - कॅप्टन अमरिंदर

आगामी निवडणुकांसाठी मनसे कामाला लागली आहे. सुरुवातीला पुणे, नाशिकवर लक्ष केंद्रीत करीत अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे शहराचा एकाच महिन्यात दोन वेळा दौरा केला. त्यांच्या नाशिक दौऱ्यानंतर पुत्र अमित यांनी देखील नाशिक शहराचा दौरा केला. पुणे नाशिक नंतर राज यांनी कल्याण डोंबिवलीकडे आपले लक्ष केंदीत केले आहे.

हेही वाचा: भावना गवळी यांनी ७ कोटींची चोरी केली - किरीट सोमय्या

1 ते 3 ऑक्टोबर दरम्यान मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, शिरीष सावंत हे या दौऱ्यात सामील असणार आहेत. दोन वेगवेगळ्या टीम मध्ये हे नेते येणार असून शाखाध्यक्षांपर्यंत बैठका घेतल्या जाणार आहेत. डोंबिवलीत नितीन सरदेसाई तर कल्याण मध्ये शिरीष सावंत हे सुरवातीला असतील तसेच अमित ठाकरे हे देखील त्यांच्यासोबत असतील. डोंबिवलीतील सर्वेश सभागृहात ही आढावा बैठक पार पडण्याची शक्यता आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

loading image
go to top