"कचऱ्यात पण भ्रष्टाचार करून पैसा खाणाऱ्यांना थोडीतरी लाज-शरम उरली असेल तर! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने ठाणे महानगरपालिकेवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागेल."
डोंबिवली : गेल्या तीन दिवसांपासून ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) डायघर कचरा प्रकल्पातील (Daighar Waste Project) कचऱ्याच्या ढिघांना आग लागली आहे. अद्याप या आगीवर नियंत्रण आलेले नाही, तर यामुळे आजूबाजूच्या गावांत धूर पसरला असून नागरिकांना याचा त्रास होऊ लागला आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याच नेत्याने लक्ष न दिल्याने अखेर मनसेने आवाज उठवला आहे.