
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेने 15 ऑगस्ट निमित्त कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात चिकन मटण विक्रीसाठी बंदी घातली आहे. याबाबतच्या नोटीसा महापालिका क्षेत्रातील चिकन व मटन विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील कल्याण डोंबिवली महापालिकेने चिकन मटण विक्रेत्यांना दिला आहे.