esakal | 'महापालिकेचे सात आयुक्त फुकट पगार खायला नेमलेत का?'

बोलून बातमी शोधा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे
'महापालिकेचे सात आयुक्त फुकट पगार खायला नेमलेत का?'
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: "मागच्या तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत होती. सरकारलाही याची माहिती होती. मग आरोग्य यंत्रणा उभं करण्याचं काम कोणाचं होतं?. मंत्रिमंडळाच्या बैठकीत फक्त लॉकडाउनबद्दल चर्चा होते का? आरोग्य यंत्रणा सुधारण्यावर चर्चा होत नाही का?" असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

"कोरोना रुग्णांचे आकडे वाढत असताना तुमचा टास्क फोर्स काय करत होता?. किती प्रमाणात रुग्ण वाढणार याचा अंदाज का नाही लावला? किती रुग्ण वाढतील, किती ऑक्सिजन लागेल, कशी व्यवस्था उभी करायची, याच विचार का नाही केला? मुंबई महापालिकेला सात आयुक्त आहेत, त्यांना फुकटचा पगार खायला नेमलं आहे का?" अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला.

हेही वाचा: मुंबईत कोरोना रुग्णाकडून नर्सवर चाकू हल्ला

"आता कडक लॉकडाउन करणार मग मागचे दहा दिवस रंगीत तालिम करत होता का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला. ऑक्सिजन लागणार होता. मग मागच्या दोन महिन्यात व्यवस्था का नाही केली? सुरु केलेली कोविड सेंटर बंद का केली? हे नियोजन सरकारने का नाही केलं? फक्त जनतेला दोष द्यायचा. रोज सकाळी दादर भाजी मार्केट दाखवून जनतेला दोषी ठरवायचं" यावरुनही संदीप देशपांडेंनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा: मुंबईत हॉस्पिटलबाहेर मुलांच्या डोळ्यासमोर वडिलांनी सोडले प्राण

"दहावी-बारावीची परीक्षा रद्द करा, हे राज ठाकरेंनी आधीच सांगितलं होतं. पण सरकाराला हे उशिरा का सुचतं? दहावी-बारावीच्या मुलांचं करीअर पणाला लागलय. वर्षा गायकवाड यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला, पण पुढच्या नियोजनाचं काय?" असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला.