esakal | मुंबईत हॉस्पिटलबाहेर मुलांच्या डोळ्यासमोर वडिलांनी सोडले प्राण

बोलून बातमी शोधा

oxygen
मुंबईत हॉस्पिटलबाहेर मुलांच्या डोळ्यासमोर वडिलांनी सोडले प्राण
sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: मुंबईत ऑक्सिजनचा पुरेसा साठा असून कुठल्याही रुग्णाला ऑक्सिजन कमी पडणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळी आहे. मुंबईत भाभा रुग्णालयाबाहेर एका ५७ वर्षीय रुग्णाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. खार येथे राहणारे श्रीकांत म्हात्रे यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या ५७ वर्षीय वडिलांनी व्हीलचेअरवरच प्राण सोडले. भाभा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

व्हीलचेअरवर असताना श्रीकांत म्हात्रे यांच्या वडिलांना धाप लागत होती. कारण शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले होते. रुग्णालयात बेड मिळावा म्हणून ते बाहेर थांबले होते. भाभा रुग्णालयाबाहेर काढलेले ते सहा तास मी कधीच विसरणार नाही. ऑक्सिजन नसल्यामुळे दीपक म्हात्रे यांना रुग्णालयात दाखल करुन घेतले नाही. दुपारी अडीजच्या सुमारा दीपक यांनी प्राण सोडले. ऑक्सिजन बेडचा शोध सुरु केल्यानंतर चार तासांनी त्यांचा मृत्यू झाला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: ''कोणत्याही पक्षाला रेमडेसिवीर विकण्याचा अधिकार नाही''- राजेंद्र शिंगणे

दीपक म्हात्रे यांना मलेरीया झाला होता. त्यांना ताप आला होता व अन्य लक्षणे दिसली, तेव्हा ती कोविडची लक्षणे आहेत, असे कुटुंबियांना वाटले नाही. रविवारी सकाळी त्यांना श्वास घेताना त्रास व्हायला लागला. सकाळी आठच्या सुमारास श्रीकांत यांनी वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधला. तेव्हा त्यांना ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. "दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये बघतो आणि तुम्हाला सांगतो असे त्यांनी सांगितले. पण १० वाजेपर्यंत त्यांनी संपर्क केला नाही. त्यानंतर आम्ही भाभा रुग्णालयात गेलो" असे श्रीकांतने सांगितले.

हेही वाचा: मुंबईत कोरोना रुग्णाकडून नर्सवर चाकू हल्ला

भाभा रुग्णालयाने म्हात्रे कुटुंबियांना शुक्रवारपासून ऑक्सिजन उपलब्ध नाहीय. त्यामुळे ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना दाखल करुन घेत नाहीय असे सांगितले. "माझ्या वडिलांच्या बोटाला ऑक्सिमीटर लावलेले होते. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ५५ टक्क्यापर्यंत घसरली. आम्ही असहाय्य होतो. प्रत्येक ठिकाणी फोन करत होतो" असे श्रीकांत यांनी सांगितले.

श्रीकांतचा भाऊ संतोषने सुद्धा अनेक खासगी हॉस्पिटल्समध्ये बेड्ससाठी फोन केले. पण प्रत्येक ठिकाणी कोविड रिपोर्ट्बद्दलच विचारत होते. अखेर दुपारी २.३० च्या सुमारास दीपक यांची प्राणज्योत मालवली. ऑक्सिजन बेड उपलब्ध झाला असता, तर आम्ही आमच्या वडिलांना वाचवू शकलो असतो, असे श्रीकांतने सांगितले. दीपक यांच्यामागे पत्नी, दोन मुलं, सूना आणि नातवंड असा परिवार आहे.