
MNS Leader Son: मुंबईतील अंधेरी इथं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे हिच्या गाडीचा अपघात झाला. या घटनेनंतर राजश्रीने मनसेचे नेते जावेद शेख यांच्या मुलावर गंभीर आरोप केले आहेत. मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल हा मद्यपान करून कार चालवत होता आणि त्याच्यामुळे अपघात झाला असं तिने म्हटलंय. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओसुद्धा शेअर केलाय.