
मीरा-भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मोर्चा निघणार आहे मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असून मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना पहाटे साडेतीन वाजता ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत कालपासून प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली होती. अविनाश जाधव यांनाही नोटीसही बजावली होती.