मनसे आमदार राजू पाटील यांच्या कारला अपघात; 75 लाखांच्या कारचा चक्काचूर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 December 2019

मनसे आमदार राजू पाटील सध्या नागपूर अधिवेशनामध्ये आहेत. बुधवार रात्री साडे अकराच्या सुमारास डोंबिवलीतील एक्सपेरीया मॉल ते काटई टोल नाक्यादरम्यान हा अपघात झाला.

कल्याण : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे मनसे आमदार राजू पाटील यांच्या कारला बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास विचित्र अपघात झाला. सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून त्यांच्या 75 लाखाच्या कारचा चक्काचुर झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मिळालेल्या माहितीनुसार, मनसे आमदार राजू पाटील सध्या नागपूर अधिवेशनामध्ये आहेत. बुधवार रात्री साडे अकराच्या सुमारास डोंबिवलीतील एक्सपेरीया मॉल ते काटई टोल नाक्यादरम्यान हा अपघात झाला. कारचा ड्रायव्हर पेट्रोल भरुन येत असताना पलावा सिटी जवळील रेल्वे उड्डाणपुलावरुन त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार भरधाव वेगाने खाली कोकण रेल्वे रुळावर कोसळली. सुदैवाने ड्रायव्हरने गाडीतून वेळीच उडी मारल्याने कोणालाही इजा झाली नाही, मात्र गाडीचा चक्काचूर झाला. अपघातग्रस्त कार ही ‘मुश्तान्ग’ कंपनीची आहे. या गाडीची किंमत 75 लाख रुपये इतकी असल्याची समजते.

ट्रम्प यांना मोठा झटका; महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर

रेल्वेकडून ट्रॅकमनचा सत्कार होणार..
रेल्वेच्या ट्रॅकमन पद्माकर हिरा शेलार, हा बुधवारी रात्री मोटरसायकलवरून पेट्रोलिंग ड्युटीसाठी जात असताना निळजे आरओबीवरून जात असताना गाडीला अपघात झाला. अपघात ग्रस्त कार रेल्वे रुळावर पडलेली पाहून त्याने तातडीने सर्व संबंधितांना कळवले आणि गाड्या थांबविण्यात आल्या. दुर्घटना टाळण्यासाठी त्याला पुरस्कार देण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

माझ्याविरोधात महाभियोग हा लोकशाही उद्‌ध्वस्त करण्याचा डाव : ट्रम्प 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS MLA Raju Patil car accident near Dombivali