
बीजिंग, बॅंकॉक आणि मलेशिया असा प्रवास करून भारतात परतलेल्या वाशीतील एका 29 वर्षीय महिलेला कोरोना विषाणूची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या महिलेला शनिवारी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या या महिलेवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.
चीनहून परतली, अन् 'कोरोना' घेऊन आली!
नवी मुंबई : बीजिंग, बॅंकॉक आणि मलेशिया असा प्रवास करून भारतात परतलेल्या वाशीतील एका 29 वर्षीय महिलेला कोरोना विषाणूची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. "कोरोना'बाधित रुग्णांसाठी विमानतळावरील तपासणीत या महिलेवर संशय आल्याने अधिकाऱ्यांनी या महिलेला शनिवारी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या या महिलेवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.
ही बातमी वाचली का? घर खरेदी करायचंय? लवकरच नवी मुंबईत ५ हजार घरे...
संबंधित महिला कामानिमित्ताने परदेशात गेली होती. बॅंकॉक आणि मलेशिया या दोन देशांच्या दौऱ्यानंतर चीनमधील बीजिंग शहरातून 19 फेब्रुवारीला ती भारतात परतली. दरम्यान, विमानतळावर तिची तपासणी केली असता तिच्यात "कोरोना'ची लक्षणे आढळून आली. महिलेला ताप असल्यामुळे शनिवारी तत्काळ कस्तुरबा गांधी रुग्णालयात रवानगी करण्यात आली. सध्या या महिलेवर उपचार सुरू असून, सर्व चाचण्या घेण्यात आल्यानंतरच रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ही बातमी वाचली का? कांदा, बटाटा, लसणाच्या दरात मोठी घसरण! वाचा काय आहेत भाव..?
विमानतळावर प्रवाशांची तपासणी
18 जानेवारीपासून आत्तापर्यंत परदेशातून भारतात येणाऱ्या तब्बल 46 हजार 218 प्रवाशांची मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पडताळणी करण्यात येत आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यासाठी विमानतळावर विशेष तपासणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 288 प्रवाशांपैकी 82 प्रवाशांना कोरोना व्हायरसची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांना कस्तुरबा येथे स्थापन केलेल्या कक्षात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. त्यापैकी 80 जणांच्या रक्ताचे नमुने तपासले असता ते कोरोनाबाधित नसल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु चीनमधील वुहान शहरातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर आरोग्य विभागाची करडी नजर असणार आहे.
Web Title: Woman Arrives China Suspected Being Coronavirus Airport Checks
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..