शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; 'इतके' शेतकरी ठरलेत लाभार्थी...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

मुंबई - महाराष्ट्रातील महाविकास आघाडीकडून आज शेतकऱ्यांना गिफ्ट मिळालंय. महात्मा फुले कर्जमाफी योजनेची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते ही यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान महाराष्ट्र शासनाकडून जारी करण्यात आलेल्या पहिल्या यादीत ६८ गावातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. जिल्हा पातळीवर देखील आता कर्जमाफीचं काम सुरु करण्यात आलंय. येत्या २४ तासांमध्ये या सर्व शेतकऱ्यांच्या शेतकरी कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. 

मुंबई - महाराष्ट्रातील महाविकास आघाडीकडून आज शेतकऱ्यांना गिफ्ट मिळालंय. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते ही यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्र शासनाकडून जारी करण्यात आलेल्या पहिल्या यादीत ६८ गावातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. येत्या २४ तासांमध्ये या सर्व शेतकऱ्यांच्या शेतकरी कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. जिल्हा पातळीवर देखील आता कर्जमाफीचं काम सुरु करण्यात आलंय.

मोठी बातमी  "डोनाल्ड ट्रंप यांनी शिवभोजन थाळीचा रांगेत उभं राहून आस्वादही घेतला असता"

कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीला आशीर्वाद दिल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. मागच्या सरकारने कर्जमाफी दिली, मात्र याबाबतचे आकडे मागितल्यावर कोणतीही माहिती देण्यात आली नाही. आम्ही याबाबतच्या याद्या देखील मागितल्या होत्या, मात्र मागील भाजप सरकारकडून कोणत्याही याद्या आम्हाला देण्यात आल्या नाहीत. गेली पाच वर्ष भाजप सत्तेत होतं, गल्लीपासून दिल्लीत भाजपचं सरकार होतं. अशातही भाजप तोंड लपवत फिरत होतं. त्यामुळे आम्हाला बोलण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही. भाजप विरोधात असल्याने आता त्यांच्याकडे आरोप करण्यावाचून काही काम नाही असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणालेत.  

मोठी बातमी पाकिस्तानी एजंटचा ई-मेल, ७ जण भारतात करणार दहशतवादी हल्ला...

  • १५,३५८ लाभार्थ्यांची यादी जाहीर... 
  • पहिल्या टप्प्यात ६८ गावांचं समावेश... 
  • ३४ लाख ८३ हजार ९०८ खात्यांची माहिती संकलित... 
  • ४५०० शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप पूर्ण... 
  • कर्जमाफीसाठी १५ हजार कोटीची पुरवणी मागणी पटलावरती...  
  • २७ फेब्रुवारी आणि २ मार्चला याबाबत होणार चर्चा... 
  • जिल्हापातळीवर कर्जमाफीचं काम सुरु...
  • कर्जमाफीनंतर प्रमाणपत्रांचे वाटप होणार...

मोठी बातमी - चीनहून परतली, अन् 'कोरोनो' घेऊन आली!'

दरम्यान, या कालच महाविकास आघाडीच्या कॅबिनेटची बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्रीही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ही घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, आता कर्जमाफीची दुसरी यादी २८ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील शेकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. 

first list of mahatma phule farmers loan wavier is out amount will be deposited in 24 hour


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: first list of mahatma phule farmers loan wavier is out amount will be deposited in 24 hour