Dombivali News : महाराष्ट्र सैनिकांना वाटत राजू पाटील खासदार व्हावे; मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिले सूतोवाच

कल्याण लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर राज ठाकरे हे आले असून यावेळी त्यांनी एक वेगळेच सुतोवाच दिले आहेत.
Raj Thackeray
Raj ThackeraySakal

डोंबिवली - कल्याण लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर राज ठाकरे हे आले असून यावेळी त्यांनी एक वेगळेच सुतोवाच दिले आहेत. मनसेचे आमदार राजू पाटील यांची संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी लोकप्रियता आहे. महाराष्ट्र सैनिकांना वाटतं की ते खासदार व्हावेत.

याविषयी योग्य निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे व राजू पाटील दोघेही घेतील असे त्यांनी सांगितले. त्यासोबतच राजकीय घडामोडींवर राज हे उद्या स्पष्ट भूमिका मांडतील, असेही जाधव म्हणाले. यामुळे आता राज ठाकरे उद्या नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे संध्याकाळी कल्याण शहरात दाखल झाले आहेत. मनसेचे आमदार राजू पाटील, नेते अविनाश जाधव यांसह मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. कल्याण पश्चिमेतील स्प्रिंग टाईम हॉटेल मध्ये राज ठाकरे हे थांबले आहेत. यावेळी मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी एक वेगळेच संकेत देऊ केले आहेत.

कल्याण लोकसभेवर मनसे आपला उमेदवार देणार का ? याविषयी काही निर्णय घेतला जाणार आहे का? असा प्रश्न विचारला असता जाधव म्हणाले, मला वाटतं उमेदवार कल्याण लोकसभेमध्ये असेल, भिवंडी लोकसभेमध्ये असेल, उर्वरित महाराष्ट्रात असेल. आमच्या आमदाराची लोकप्रियता खूप आहे. आणि आमच्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला वाटतं की राजू पाटील हे खासदार व्हावेत. कार्यकर्त्यांची ती भावना आहे. निर्णय सन्माननीय राजसाहेब आणि राजू पाटील दोघे घेतील असे सांगितले.

पुढे बोलताना अविनाश जाधव म्हणाले, कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे आलेले आहेत. भिवंडी मतदार संघाची बैठक ही नंतर होईल. आज आणि उद्या ज्या बैठका होणार आहेत. त्या कल्याण लोकसभा मतदार संघात होणार आहेत.

भाजप व मनसेची जवळीक होत आहे त्याविषयी बोलताना जाधव म्हणाले, त्या दिवशी राज ठाकरे म्हणाले होते की आज मी शिक्षकांच्या विषयात बोलतो. राजकारणाच्या वेळेला राजकारणावर बोलेल. तर उद्या त्यांची पत्रकार परिषद आहे. त्यावेळी ते नक्की यावर बोलतील.

मागील काही दिवसात कल्याण लोकसभेमध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहेत. आता आमच्या ज्या बैठका चालू आहेत. त्या कल्याण लोकसभेच्या आढावा बैठक सुरू आहेत. राज यांच्याकडून आज कल्याण शहराच्या बैठका होतील व उद्या डोंबिवली शहराच्या बैठका होतील. उद्या सकाळी राज यांची पत्रकार परिषद होईल.

संपूर्ण आढावा बैठकीदरम्यान सध्याची परिस्थिती आणि लोकांचे मत राज ठाकरे हे जाणून घेणार आहेत. आणि उद्याच्या पत्रकार परिषदेत ते सगळं उघड बोलतील. आपण एक दिवसांची वाट पाहूया. महाराष्ट्रासह कल्याण डोंबिवलीमध्ये जे काही घडत आहेत त्याविषयी ते आपले स्पष्ट भूमिका मांडतील असे जाधव यांनी यावेळी सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवस कल्याण आणि डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत.कल्याण पश्चिम मध्ये पदाधिकारी यांची भेट घेणार आहेत.तर शनिवारी सकाळी सुद्धा डोंबिवलीत पदाधिकारी यांची भेट घेणार कल्याण लोकसभा संदर्भात पदाधिकारी यांच्याची चर्चा करणार आहेत. पहिले इच्छुक उमेदवार यांची राज ठाकरे चर्चा करतील आणि शहरांतील प्रमुख पदाधिकारी याची चर्चा आढावा घेतील. नंतर सर्वं कार्यकर्ते यांच्याशी बांधिस्त हॉल मध्ये चर्चा करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com