esakal | मनसे आमदारानं KDMCला दिलं नवं नाव; अनेकांना पटला मुद्दा
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

मनसे आमदारानं KDMCला दिलं नवं नाव; अनेकांना पटला मुद्दा

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) महापालिका क्षेत्रातील रस्ते आणि त्यावरचे खड्डे कोणालाच नवीन नाहीत. या खड्ड्यांवरून निवडणुकाही (Election) लढल्या गेल्या आणि आंदोलनेही झाली. स्मार्ट सिटीचे स्वप्न कल्याण डोंबिवलीकरांना आता दाखविले जात आहे. मात्र हा शहर कधी सुधारेल का? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडतो. त्यातच मनसे आमदार राजू पाटील यांनी KDMC ची नवीन व्याख्या ट्विट करीत नागरिकांच्या मनातील खदखदच जणू त्यातून व्यक्त केली आहे.

त्यांचे ते ट्विट केडीएमसीला री ट्विट करत अनेकांनी पालिकेचे रस्ते, वाहतूक कोंडी या समस्येला ट्विटरवर वाचा फोडली आहे.

mumbai

mumbai

कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणजेच किडीएमसी हा शॉर्ट फॉर्म आपल्याला माहीतच आहे. मात्र शहरातील रस्ते, खड्डे, चिखल पाहता आता केडीएमसी ची नवीन व्याख्या ट्विट वर चांगलीच चर्चेत आहे. कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी मंगळवारी एक ट्विट केले. त्यात पाटील यांनी केडीएमसीची नवीन व्याख्या शोधून काढली. KDMC म्हणजे …..! K - Khadde ( खड्डे ) D - Dagad ( दगड ) M- Maati ( माती ) C - Chikhal ( चिखल ) अशी व्याख्या त्यांनी केली असून ती पालिका प्रशासनाला ट्विट केली आहे.

हेही वाचा: ‘त्यांनी’ मुलांना केवळ जन्म द्यावा, महिलांबाबत तालिबानचा सूर

यासोबतच त्यांनी स्मार्ट सिटी विकासाचे काम प्रगती पथावर आहे असा संदेश असलेला पालिकेचा फोटो आणि त्याच बाजूला खड्यामुळे रस्त्याची चाळण झालेला रस्ता हा बोलका फोटो देखील ट्विट केला आहे. या ट्विटची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

कल्याण डोंबिवलीकरांना हे शहर कधी स्मार्ट सिटी होईल यावर विश्वास बसत नाही. कोट्यवधी रुपये ओतले तरी हे शहर असेच राहणार असा त्यांना विश्वास असून तो सार्थ करण्यासाठी महापालिकेतील सर्वच जण जणू सरसावलेले असतात. दरवर्षी पावसाळा येण्याआधी रस्त्यावरील खड्डे तात्पुरते बुजवून नागरिकांची तोंड गप्प करण्याची पालिकेची सवय आता नवीन राहिलेली नाही.

हेही वाचा: नातवाचा वाढदिवस खड्डे बुजवून साजरा 

सर्व सामान्य नागरिकांच्या मनातील ही सारी खदखद आहे. त्यात केडीएमसी आमदार पाटील यांनी केलेली ही नवीन व्याख्या अगदी तंतोतंत जुळल्याने नागरिकांनी री ट्विट करत हा मुद्दा चर्चित आणला आहे. री ट्विट करताना शहरातील खराब रस्ते, कचरा, वाहतूक कोंडी चे फोटो, व्हिडीओ नागरिकांनी व्हायरल केले आहेत. आता तरी सत्ताधारी, पालिका प्रशासन यातून बोध घेत रस्त्यांची कामे नीट करणार का? हे पहावे लागेल.

loading image
go to top