

MNS Party Many leaders have resigned
ESakal
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच शहरातील राजकारण वेगाने कलाटणी घेत आहे. एकीकडे भाजप व शिवसेना शिंदे गटाकडून विरोधी पक्षांतील बड्या नेत्यांना आपल्या गोटात ओढण्याचे प्रयत्न तीव्र झाले असताना, दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून महत्त्वाच्या नेत्यांचे राजीनामे आणि त्याच वेळी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.