ठाण्यात मनसेचे शक्तिप्रदर्शन

ठाणे - मनसेच्‍या मोर्चामध्ये हजारोेंच्‍या संख्येने कार्यकर्ते आले होते.
ठाणे - मनसेच्‍या मोर्चामध्ये हजारोेंच्‍या संख्येने कार्यकर्ते आले होते.

ठाणे - लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपली राजकीय ताकद दाखविण्यास सुरुवात केली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढून मनसेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या वेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चामध्ये परप्रांतीयांचेही प्रमाण लक्षणीय होते.

२७ गावांची वेगळी नगरपालिका, दिवा क्षेपणभूमी, क्‍लस्टर योजना, कोपरी रेल्वे ब्रिज, ६५०० कोटींचे पॅकेज या माध्यमातून सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा दावा करत मनसेने सोमवारी मोर्चा काढला. जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, अभिजित पानसे, राजू पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. त्याची तयारी गेल्या महिन्यापासून करण्यात आली होती. दुपारी दीडच्या सुमारास मनसेचे हजारो कार्यकर्ते तीन हात नाका येथे जमा झाले होते. संभाव्य गर्दी विचारात घेऊन वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केल्याने तसेच दुपारची वेळ असल्याने मोर्चाचा वाहतुकीला विशेष फटका बसला नही. मोर्चामध्ये जिल्ह्यातील आदिवासी महिला-पुरुषही मोठ्या संख्येने दिसत होते. त्याचबरोबर तरुणांचीही संख्या लक्षणीय होती. या वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. मोर्चातील सहभागी कार्यकर्त्यांनी पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार मार्गक्रमण केल्याने मोर्चा सुरळीत पार पाडला. 

युती सरकारकडून नागरिकांची फसवणूक!
युती सरकारने केवळ नागरिकांना लुबाडण्याचे काम केले. शिवसेना आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही पक्षांनी केवळ आश्‍वासनाचे गाजर देऊन जनतेची फसवणूक केली आहे, असा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. याचवेळी जनता आता युती सरकारच्या फसवेगिरीला बळी पडणार नसल्याचेही बजावण्यात आले. आजच्या घडीला अच्छे दिनच्या नावाखाली जनतेला केवळ महागाईच्या दरीत लोटण्याचे काम भाजप सरकार करत असल्याचाही आरोप या वेळी करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com