...तर संघर्ष अटळ; राज यांचा आक्रमक पवित्रा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

मुंबई - कोस्टल रोडमुळे वरळी कोळीवाड्यातील मासेमारांचा रस्ता अडवला जाऊ नये म्हणून महापालिका आयुक्तांची भेट घेऊ. सामंजस्याने तोडगा निघायला हवा; मात्र आडमुठेपणा केल्यास संघर्ष अटळ आहे, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी (ता. 16) दिला. 

कोस्टल रोड वरळी येथे सागरी सेतूला जोडण्यासाठी समुद्रात खांब उभारला जाणार आहे. त्यामुळे कोळीवाड्यातील मासेमारी नौकांना अडथळा येणार आहे. दुसऱ्या बाजूला खडक असल्याने तेथून नौका घेऊन जाता येणार नाहीत. पूर्वी हा खांब बांधण्यात येणार नव्हता; मात्र खांब बांधण्याचा निर्णय झाल्याने त्याविरोधात मच्छीमारांनी आंदोलन सुरू केले आहे. राज ठाकरे यांनी रविवारी या आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रश्‍नी सोमवारी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याशी चर्चा करणार आहोत, असे राज यांनी सांगितले. 

नौकांना कोस्टल रोडखालून समुद्रात जावे लागेल; परंतु हा मार्ग अरुंद असल्याने मासेमारी नौकांना जाता येणार नाही. कोस्टल रोडच्या कामांमुळे समुद्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचेल. त्यामुळे मासेमारीला धोका निर्माण होईल. प्रकल्पाच्या कामादरम्यान टाकाऊ वस्तूही समुद्रातच राहणार असल्याने माशांचे प्रमाण कमी होण्याची शक्‍यता आहे, असे प्रीतम शिवडीकर म्हणाले. 

Web Title: MNS President Raj Thackeray said that if stubbornness then the struggle is inevitable