इंधन दरवाढी विरोधात मनसेचा मोर्चा

नंदकिशोर मलबारी
शनिवार, 26 मे 2018

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मुरबाड मनसेच्या वतीने मुरबाड शहरात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा इंधन दरवाढीच्या निषेधार्थ असल्याने मोर्चाला लोकांचा प्रतिसाद मिळणे गरजेचे होते. मात्र, लोकांचा प्रतिसाद बेताचा होता. सर्व पक्षांना माननारे कार्यकर्ते मात्र प्रत्येक्ष या मोर्चात सहभागी झाले नसले तरी इंधन दरवाढ कमी झाली पाहीजे अशा चर्चेने या मोर्च्याला धन्यवाद देत होते.

सरळगांव (ठाणे) : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मुरबाड मनसेच्या वतीने मुरबाड शहरात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा मोर्चा इंधन दरवाढीच्या निषेधार्थ असल्याने मोर्चाला लोकांचा प्रतिसाद मिळणे गरजेचे होते. मात्र, लोकांचा प्रतिसाद बेताचा होता. सर्व पक्षांना माननारे कार्यकर्ते मात्र प्रत्येक्ष या मोर्चात सहभागी झाले नसले तरी इंधन दरवाढ कमी झाली पाहीजे अशा चर्चेने या मोर्च्याला धन्यवाद देत होते.

दररोज इंधनाची दर वाढ होत असल्याने हातावर पोट असणाऱ्या दुचाकी चालकांचे मात्र कंबरडे मोडले आहे. मुरबाड तालुका हा ग्रामीण तालुका म्हणून ओळखला जातो. या भागात चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकीने एमआयडीसी मध्ये कामाला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तुटपुंजा पगारावर काम करणाऱया कामगारांना आपला उदरनिर्वाह करणे कठीन होऊन बसले असतानाच दररोज इंदनाची वाढ होत असल्याने अनेकांना वाहन चालवणे अवघड झाले आहे. जनतेला होणाऱ्या त्रासाची नेहमीच दखल घेणाऱ्या मनसेने या निषेधार्थ बैलगाडी मोर्चा काढून व गाजर वाटून  शासनाचा निषेध केला.                         

Web Title: mns protest against fuel rates hike

टॅग्स