MP kapil Patil
MP kapil PatilSakal

Dombivali News : वाटलं राज ठाकरे आले...; पण निघाला खासदार कपिल पाटलांचा ताफा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसांच्या कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत.

डोंबिवली - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत. कल्याण मधील दुर्गाडी येथे त्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते उभे होते. पोलिसांच्या सायरनचा आवाज आला आणि कार्यकर्त्यांना वाटलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आगमन होत आहे. त्वरित फटाक्यांची माळ लावली गेली.

फटाक्यांच्या धुमधडाक्यात घोषणाही देण्यात आल्या. परंतु गाड्या न थांबताच पुढे निघून गेल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. प्रत्यक्षात कार्यकर्त्यांना वाटलं राज ठाकरे आले परंतु तो केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा ताफा निघाल्याने कार्यकर्त्यांचा एकच फज्जा उडाला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसांच्या कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी कल्याण येथे ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे. राज ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी कल्याणचे द्वार असलेल्या दुर्गाडी चौकात मनसे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले. दरम्यान भिवंडीहून कल्याणच्या दिशेने पोलिसांच्या सायरनचा आवाज आल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा आल्याचे कार्यकर्त्यांना वाटले.

यामुळे घोषणा देण्याबरोबरच फटाक्यांची त्वरित आतिषबाजी करण्यात आली. मात्र हा ताफा न थांबताच पुढे गेल्याने एकच गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांना वाटले राज ठाकरे थांबलेच नाहीत. त्यामुळे त्यांचा काहीसा हिरमोड देखील झाला.

परंतु त्वरित असे समजले की हा ताफा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नसून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा होता. यामुळे कार्यकर्त्यांचा एकच फज्जा उडाला. पुन्हा फटाके आणण्यासाठी व आपल्या नेत्याचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ उडाली.

भाजप खासदार कपिल पाटील यांचे मनसेकडून स्वागत

कल्याण मध्ये राज ठाकरे येणार आहे त्यांच्या स्वागतासाठी उभे असलेले कार्यकर्त्यांना केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या गाडीचा सायरनचा आवाज आल्याने राज ठाकरे आले असे वाटल्याने कार्यकर्ते फटाके वाजून झाले मोकळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com