esakal | 'लेटरबॉम्ब'वरून राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'मूळ मुद्दा भरकटू नये'
sakal

बोलून बातमी शोधा

'लेटरबॉम्ब'वरून राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'मूळ मुद्दा भरकटू नये'

१०० कोटी रुपयांच्या गौप्यस्फोटानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या शैलीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे

'लेटरबॉम्ब'वरून राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'मूळ मुद्दा भरकटू नये'

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या गौप्यस्फोटानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावर महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या शैलीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यावर केलेले आरोप हे देशातील पहिलीच घटना असेल. या प्रकरणावरुन अनिल देशमुख यांची चौकशी होणं गरजेचं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई प्रमाणे इतर पोलिस आयुक्तांकडे किती मागणी केली हे बाहेर आलं पाहिजे. गृहमंत्र्यावर झालेले आरोप, किंवा वाझे यांची दररोजची होणारी चौकशी. या सर्व प्रकरणामुळे मुळ प्रकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. मुळ मुद्दा हा आहे की अंबानी यांच्या घराबाहेर उभा असणाऱ्या गाडीमध्ये जिलेटन आलं कुठून आलं? या प्रकरणाची चौकशी पूर्ण व्हायला हवी, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेत त्यांनी राज्यातील हलचालीवर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. 

हे वाचा - "स्वतःला वाचवण्याची परमबीर सिंग यांची धडपड"; अनिल देशमुखांनी फेटाळले आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचे जिव्हाळ्याचे संबध आहेत. तसेच सचिन वाझे या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळाचा माणूस आहे. असं असतानाही एखाद्या पोलिस आधिकाऱ्यानं अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं असणारी गाडी ठेवण्याचं धाडस कोणाच्या सांगण्यावरुन केलं. याची चौकशी झालीच पाहिजे. या सर्व प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र सरकारनं न करता यामध्ये केंद्र सरकारनं हस्ताक्षेप करायला हवा. कोणाच्यातरी सांगण्यावरुनच पोलिसांनी अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं असणारी गाडी ठेवली असणार आहे. त्यामुळे या प्रकरणाचा गांभिर्यानं तपास व्हायला हवा. केंद्र सरकारनं कसून चौकशी केल्यास यामधून अनेकांची नावं समोर येतील. तुम्ही विचारही करु शकणार नाहीत, अशा लोकांची नावं समोर येतील, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. 
हेही वाचा - मोठी बातमी; शरद पवारांनी दिल्लीत बोलावली NCP नेत्यांची बैठक

राज ठाकरे यांनी शनिवारी रात्री ट्विटही करत महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारी घटना असल्याचं म्हटलं होतं. राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, 'मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.'

loading image