

MNS Harshad Patil
ESakal
डोंबिवली : राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी, पक्षांतील संघटनात्मक फेरबदल आणि स्थानिक पातळीवरील वाढत्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्याण-डोंबिवलीत संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्षाने डोंबिवली विधानसभा आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करत हर्षद पाटील यांची डोंबिवली शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.