esakal | लॉकडाऊन राहावा की संपुष्टात यावा? ७०.३ टक्के नागरिक म्हणतायत संपवा लवकर
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाऊन राहावा की संपुष्टात यावा? ७०.३ टक्के नागरिक म्हणतायत संपवा लवकर

लॉकडाऊन हवं का नाही याबाबत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक सर्व्हे घेतला होता

लॉकडाऊन राहावा की संपुष्टात यावा? ७०.३ टक्के नागरिक म्हणतायत संपवा लवकर

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : लॉकडाऊन हवं का नाही याबाबत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक सर्व्हे घेतला होता. त्याचा निकाल आता जाहीर करण्यात आलाय. देशात लॉकडाऊन सुरु होण्या आधीपासून महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू झालाय. लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या जीववनावर कसा परिणाम झाला?

यामध्ये नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीत कसा बदल झाला. पुढे लॉकडाऊन राहावा किंवा राहू नये ? प्रवासी लोकलसेवा आणि एसटी सेवा पूर्वरत सुरू झाली पाहिजे का?     लॉकडाऊनच्या काळात वैद्यकीय मदत वेळेत आणि योग्य प्रकारे मिळाली आहे का? लॉकडाऊनच्या काळात बुडालेल्या नोकरी आणि उद्योगंधद्यासाठी राज्य सरकारकडून योग्य मदत मिळाली का? या आणि अशा प्रश्नावर नागरिकांकडून त्यांचं मत नोंदवून घेतलं गेलं. 

मोठी बातमी : आता कसं वाटतंय, शांत शांत वाटतंय ! वीस वर्षात पहिल्यांदाच मुंबईत शांततेत विसर्जन

कोणत्या प्रश्नावर नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहुयात 

  • आता संपूर्ण लॉकडाऊन संपुष्टात आणला पाहिजे का ? या  प्रश्नावर ७०.३ टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलंय. तर २६ टक्के नागरिकांनी नाही असं उत्तर दिलं आहे. तर उर्वरित ३.७ टक्के लोकांनी माहित नाही असं म्हटलंय. 
  • लॉकडाऊनच्या काळात तुम्हाला वैद्यकीय मदत वेळेत आणि  योग्य पद्धतीने मिळाली का ? यावर २५.९ टक्के नागरिकांनी होय अस उत्तर दिलंय तर ६०.७ टक्के नागरिकांनी नकारात्मक म्हणजे नाही असं उत्तर दिलं आहे. तर १३.४ टक्के नागरिक माहित नाही असं म्हणालेत. 
  • लॉकडाऊनमुळे तुमच्या नोकरीवर नकारात्मक परिणाम झाला आहे का? यावर ८९.८ टक्के नागरिकांनी होय असं उत्तर दिलंय तर नाही असं उत्तर देणारे ८.७ टक्के नागरिक आहेत.
  • लॉकडाऊनच्या काळात बुडालेल्या नोकरी किंवा उद्योगंधद्यासाठी राज्य सरकारकडून योग्य मदत मिळाली का? यावर नाही असं ८४.९ टक्के नागरिक म्हणतायत. तर केवळ ८.७ टक्के नागरिक होय असं म्हणतायत. 

मोठी बातमी :  तब्बल १९ तासानंतर चिमुकल्या मोहम्मदला NDRF ने काढलं ढिगाऱ्याबाहेर आणि सर्वांनी म्हटलं गणपती बाप्पा मोरया

  • लॉकडाऊनच्या काळातील वीजबिलांबाबत आपण समाधानी आहात का? यावरही तब्ब्ल ९०.२ टक्के नागरिक नाखूष आहेत. केवळ ८.३ टक्के नागरिकांनी होय असं उत्तर दिलं आहे. 
  • आता प्रवासी लोकलसेवा, रेल्वेसेवा आणि बस सेवा (एसटी) पूर्वरत सुरू झाली पाहिजे का?याबाबत होय म्हणणारे ७६.५ टक्के नागरिक आहेत. तर नाही म्हणणारे १९.४ टक्के नागरिक आहेत 
  • शालेय शुल्काबाबतच्या सरकारी धोरणांची अंमल बजावणी होत आहे का? या प्रश्नावरही नागरिक नाखूष पाहायला मिळाले. तब्बल ७४.३ टक्के नागरिकांनी नाही असं उत्तर दिलं आहे तर होय म्हणणारे १०.३ टक्के आहेत. आम्हाला ठाऊक नाही असं म्हणणारे  १५. ४ टक्के नागरिक आहेत. 
  • राज्य सरकारने तुमच्या मुलांच्या शिक्षणाबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे का? यामध्येही पन्नास टक्क्यांवर नागरिक नाही म्हणालेत.  नाही म्हणणाऱ्यांची टक्केवारी ५२.४ टक्के एवढी आहे. तर होय म्हणणारे ३२.७ टक्के आहेत. माहित नाही असं म्हणणारेही १४.९ टक्के आहेत. 

MNS revelied results of the survey taken by party on lockdown and lives of people during covid

loading image
go to top