कोरोनावरील उपचारासाठी तब्बल १३ लाखांचे बिल; मनसेकडे धाव घेताच...!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

गोरेगाव येथिल लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये महिला कोरोना रुग्णाचे लाखो रुपयांचे बिल केले. त्यानंतर रुग्णाच्या कुटुंबियांनी मनसेकडे धाव घेतल्यामुळे मनसेने रुग्णालय प्रशासनाला या बाबत जाब विचारत बिल कमी करुन रुग्णाला घरी सोडण्यास सांगितले.

गोरेगाव : गोरेगाव येथिल लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये महिला कोरोना रुग्णाचे लाखो रुपयांचे बिल केले. त्यानंतर रुग्णाच्या कुटुंबियांनी मनसेकडे धाव घेतल्यामुळे मनसेने रुग्णालय प्रशासनाला या बाबत जाब विचारत बिल कमी करुन रुग्णाला घरी सोडण्यास सांगितले.

ही बातमी वाचली का? असा आहे 'तुर्भे पॅटर्न', गेल्या 10 दिवसात एकही रुग्ण नाही

गोरेगाव येथिल लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये महिला रुग्ण करोनावर उपचार घेण्यासाठी 21 जुन रोजी दाखल झाल्या होत्या. मंगळवारी उपचारा नंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार होते. मात्र रुग्णालयाने त्याचे उपचाराचे अंतिम बिल पाच लाख 13 हजार रुपये आकारले. एवढे भरमसाठ बिल पाहून महिला रुग्णाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्यात रुग्णालयात देखिल त्यांचे कुणी ऐकुन घेईना त्यामुळे अखेर कुटुंबियांनी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्याशी संपर्क केला. 

ही बातमी वाचली का? मुंबई पोलिसांची धडक कारवाई सुरुच, 'इतक्या' गाड्या जप्त

त्यानंतर नांदगावकर यांनी गोरेगाव मनसेचे विभाग अध्यक्ष वीरेंद्र जाधव यांच्याशी संपर्क करुन या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले. जाधव त्वरित लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत चौकशी केली आणि प्रशासनाला चांगलेच धारेवर घेऊन मनसे दणका दिला. शेवटी 1 लाख 70 हजार रुपयांची रक्कम कमी करुन घेत महिला रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला. त्यामुळे रुग्णाच्या कुटुंबियांनी मनसे नेते बाळा नांदगावकर आणि विभाग अध्यक्ष विरेंद्र जाधव यांचे आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS saved Corona patient's bill of lakhs of rupees