मुंबई पोलिसांची धडक कारवाई सुरुच, 'इतक्या' गाड्या जप्त

mumbai police
mumbai police

मुंबई : कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. अशात मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रार्दुभाव झाला आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात असताना अनेक जण सर्रास रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात. संचारबंदी असताना ही अनेक जण विनाकारण गाड्या घेऊन मुंबई फिरत असल्याचं आढळून आलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडक पाऊलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पोलिस अशा बेशिस्त नागरिकांवर धडक कारवाई करत आहेत. पोलिसांनी अनेक ठिकाणी चेकपोस्ट उभारले असून कारवाईचा बडगा उभारला आहे. अशातच मुंबई पोलिसांनी गेल्या दोन दिवसात तब्बल 23 हजार गाड्या जप्त केल्या आहेत. सोमवारी हा आकडा 16 हजारांहून जास्त होता. 

ऑफिसमध्ये जाणं आणि आवश्यक सेवा वगळता घरापासून 2 किलोमीटरच्या पुढे गेल्यास पोलिस नाकाबंदीत वाहने जप्त करताहेत. रविवारी पोलिसांनी दिवसभरात तब्बल 7 हजार 75 वाहने जप्त करण्यात आली. तर सोमवारी या कारवाईतून कोणालाही वाचता आलं नाही. पोलिसांनी दिवसभरात तब्बल 38,000 वाहनांची तपासणी केली. सोमवारी (29 जून) मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी 16,291 वाहने जप्त केली.

मुंबईतल्या 94 पोलिसांना त्यांच्या परिसरातील मुख्य 2 मार्गावर सकाळी 4 आणि संध्याकाळी 4 तास नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आलेत. मुंबईत रविवारपासूनच ही धडक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसाच्या पोलिस कारवाईत पोलिसांनी तब्बल 23 हजार वाहने जप्त केल्याचे सांगण्यात आलेत. वाहतूक पोलिसांनी 1 हजार 789 वाहने जप्त केलीत. त्यात तीनचाकी 128,  टॅक्सी 70, खासगी वाहने 352, दुचाकी 1329 याचा समावेश आहे. 

रविवारी 7 हजार वाहनांवर कारवाई

रविवारी पोलिसांनी दिवसभरात तब्बल 7 हजार 75 वाहने जप्त केली आहेत. सर्वाधिक कारवाई उत्तर विभागात करण्यात आली. त्यामधील 22 ठिकाणी केलेल्या नाकाबंदीत 1306 वाहने जप्त केली आहे. त्यात अनेक महागड्या गाड्यांचाही समावेश आहे.

रविवारी सर्वाधिक कारवाई अंधेरी येथील परिमंडळ 10 अंतर्गत करण्यात आल्या. या परिसरात 1297 गाड्या जप्त करण्यात आल्या. मालाड, गोरेगाव परिसरात 558, तर बोरीवली परिसरातून 748 वाहने जप्त करण्यात आली. पोलिसांनी दहिसर ते गोरेगाव परिसरात 22 ठिकाणी नाकाबंदी लावून 1306 वाहने जप्त करत कलम 188 नुसार गुन्हे दाखल केलेत.

mumbai Police continue action in lockdown seized 23 thousand vehicles

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com