esakal | असा आहे 'तुर्भे पॅटर्न', गेल्या 10 दिवसात एकही रुग्ण नाही
sakal

बोलून बातमी शोधा

turbhe

शहरातील कोरोना बाधितांचा वाढता आकडा लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने एका आठवड्याचा लॉकडाऊन जाहीर केला आहे.

असा आहे 'तुर्भे पॅटर्न', गेल्या 10 दिवसात एकही रुग्ण नाही

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. राज्यभरातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रार्दुभाव झाला आहे. शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यातच आता यात नवी मुंबईही पुढे आहे. येथे कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. शहरातील कोरोना बाधितांचा वाढता आकडा लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने एका आठवड्याचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. सोमवारपासून 5 जुलैपर्यंत दहा विशेष कंटेंन्मेंट झोनमध्ये संपूर्ण लॉकडाऊन असेल. या काळात अत्यावश्यक सुविधांमधील मेडिकल आणि दुधाची दुकानं वगळता इतर सर्व प्रकारची दुकानं बंद राहतील. त्यातच नवी मुंबईतल्या तुर्भे भागातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. 

महत्वाची बातमी : 'लालबागच्या राजा'चा गणेशोत्सव रद्द, मंडळ जपणार सामाजिक भान 

एकेकाळी कंटेन्मेंट झोन असलेले नवी मुंबईतील तुर्भे येथे दररोज 30 ते 40 प्रकरणांची नोंद केली जात होती. दरम्यान या भागातल्या नागरिकांनी कोविड-19ला यशस्वीरित्या हाताळलं आहे. गेल्या 10 दिवसात येथे एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. इतकंच काय तर गेल्या 14 दिवसांत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. सुमारे दोन लाख लोकसंख्या असलेल्या भागात बहुतेक लोकं हे झोपडपट्ट्यांमधे राहतात. हा भागात नवी मुंबई महानगरपालिकेनं (एनएमएमसी) धोरणात्मक नियोजन आणि समर्पणान्वये 'तुर्भे पॅटर्न' राबवला आहे.

नक्की वाचा : मुंबईतीलं सलून सुरु झाले खरे, पण छोट्या व्यावसायिकांना भेडसावतोय हा प्रश्न...

तुर्भे ठाणे-बेलापूर रोड जवळ आहे. कोरोना व्हायरस प्रसार जेव्हा होण्यास सुरुवात झाली तेव्हा नवी मुंबईतल्या तुर्भे भागात पहिला रुग्ण आढळून आला होता. तुर्भेच्या जवळ APMC मार्केट असल्याने, इतर नवी मुंबई भागांच्या तुलनेत येथे जास्त प्रकरणे आहेत. येथे दररोज, जवळपास 30 ते 40 रुग्ण आढळून यायचे. कधीकधी तो आकडा 50 पर्यंत देखील पोहोचायचा. त्यामुळे मे महिन्यात एपीएमसी मार्केट आठवडाभर बंद ठेवण्यात आला, असं एनएमएमसीच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. आम्हाला काहीतरी धोरणात्मक करण्याची गरज होती आणि समस्येवर निराकरण करण्यावर लक्ष केंद्रित केले. अन्यथा, ही आपत्तीजनक परिस्थिती बनू शकली असती, असंही ते म्हणाले. या भागात तुर्भे स्टोअर्स, पावणे गाव, इंदिरा नगर आणि सानपाडाचा काही भाग समाविष्ट आहे.

हे ही वाचा खाकी वर्दीची तत्परता ! एक ट्विट अन् 'त्या' व्यक्तीच्या मदतीसाठी पोलिस धावून गेले

आम्ही प्रथम कॉन्टॅक्ट-ट्रेसिंगपासून सुरुवात केली. त्या भागात आढळणार्‍या प्रत्येक रूग्णांमागे आम्ही 14 दिवसात 26 जवळचे संपर्क शोधले. आम्ही त्या रुग्णाला भेटलेल्या अधिकाधिक लोकांची नोंद ठेवली. मात्र आमचं जास्त लक्ष जवळच्या 26 लोकांवर होतं, असं तुर्भे येथील आरोग्य अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांनी सांगितलं. 

नक्की वाचा : शेवटी जे नको व्हायला हवं होतं ते झालंच, ज्यांनी केला कामाठीपुरा कोरोनमुक्त शेवटी त्यांनाच...

लोकसंख्येची उच्च मात्रा 

एनएमएमसीला भेडसावणारी आणखी एक अडचण संस्थागत विलगीकरणा (institutional quarantine) ची होती. या भागातील लोकसंख्या जास्त होती, म्हणून अधिकाऱ्यांनी अधिकाधिक लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचं ठरवलं. तसंच, सकारात्मक रूग्णांच्या जवळ असलेल्या 100 घरांमधील रहिवाशांचं स्क्रिनिंग करण्यात आलं. यामुळे कोरोना व्हायरसच्या प्रसाराची साखळी तोडण्यात यश आलं. हा भाग दाटीवाटीचा परिसर आहे. बरीच घरं एकमेकांना लागून असल्यानं लोकं बऱ्याच ठिकाणी एकत्र यायचे. यामुळे नवी मुंबई पोलिस यांच्यासह नागरी आणि आरोग्य अधिकारी या ठिकाणी नियमितपणे भेट द्यायचे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या निम्म्यांहून जास्त लोकांवर कारवाई करत दंड आकारण्यात आला. तसंच या सर्व देशभरात थैमान घातलेल्या या व्हायरसबद्दल आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांविषयी मार्गदर्शन केलं.

हेही वाचा : अरे वाह! पालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉक्टरांना पुन्हा 'ताज' चे जेवण; 1 जुलैपासून होणार सुरुवात 

आम्ही या क्षेत्रासाठी 70 टी तयार केल्या होत्या. सुरुवातीला, आम्ही लोकांवर मास्क न घातल्याबद्दल किंवा अनावश्यकपणे बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईतून आम्ही सुमारे 2 लाख रुपयांचा दंड वसूल केला. त्यामुळेच लोकांनी नंतर नियमांचं पालन केलं, असं सहायक महानगरपालिका आयुक्त समीर जाधव यांनी म्हटलं आहे. पुढे जाधव म्हणाले की, थोड्या दिवसांनी लोकांनी संवाद साधण्यास सुरुवात केली, त्यांनी आम्हाला ज्या अडचणी येत आहेत आणि आमच्याकडून त्यांना काय हवे आहे ते सांगितलं. एनएमएमसी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डबलिंग रेटही आता 64 दिवसांवर आला आहे. तुर्भेवर आतापर्यंत 1,025 कोविड-19ची प्रकरणे आढळली असून त्यापैकी 890 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आता 189 सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत तुर्भेमध्ये 46 जणांचा मृत्यू झाला.

turbhe pattern no patient in the last 10 days read detail story