‘तुमच्या राजाला साथ’शिवसेनेला महागात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

मुंबई - शिवसेनेने नाकारलेला मदतीचा हात, त्यातच पक्षात सुरू झालेली बेबंदशाही मनसेच्या पथ्यावर पडणार आहे. ‘तुमच्या राजाला साथ द्या’ ही मनसेची भावनिक साद सोशल नेटवर्कवर धुमाकूळ घालत असून शिवसेनेतील बंडाळीमुळे नाराज झालेला मतदार मनसेकडे वळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

पालिका निवडणुकीसाठी मनसेने शिवसेनेकडे टाळीसाठी हात पुढे केला होता. त्यामुळे शिवसेना-मनसेच्या मतदारांत भावनिक बंध निर्माण झाले होते. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाळी नाकारली. त्यानंतर बुधवारी झालेल्या मेळाव्यात ‘तुमच्या राजाला साथ द्या’ या भावनिक गाण्याने मनसेने साद घातली. हे गाणे सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. हे गाणे फेसबुक आणि व्हॉट्‌सॲपवर फिरत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मनसेची वातावरण निर्मिती सुरू असताना शिवसेनेत इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रचंड नाराजी आहे. कार्यकर्त्यांबरोबर शिवसेनेचे मतदारही नाराज झाले आहेत. अशा परिस्थितीत मनसेने दमदार उमेदवार दिल्यास शिवसेनेवरील नाराजीचा फायदा मनसेला होऊ शकतो. मुंबईतील किमान १० प्रभागांत ही नाराजी मनसेला लाभदायक ठरू शकते. घाटकोपर, चेंबूर, अंधेरी, कांदिवली, मुलुंड, वरळी आदी परिसरात  मनसेला या नाराजीचा फायदा होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: mns shiv sena on social media