मनसेच्या टीममधून शिशिर शिंदेंना डच्चू

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 जून 2018

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन नवी टीम जाहीर केली आहे. मात्र, या टीममधून ज्येष्ठ नेते आणि शिवसेनेची एकेकाळची मुलुख मैदानी तोफ शिशिर शिंदे यांना डच्चू मिळाला आहे.

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन नवी टीम जाहीर केली आहे. मात्र, या टीममधून ज्येष्ठ नेते आणि शिवसेनेची एकेकाळची मुलुख मैदानी तोफ शिशिर शिंदे यांना डच्चू मिळाला आहे.

मनसेने नवी कार्यकारिणी तयार केली असून, यामध्ये राज ठाकरे अध्यक्ष, तर 10 नेते आणि 12 सरचिटणीस असणार आहेत. मनसेने नव्या कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला पाठवली आहे. 20 मे रोजी मनसेची पक्षांतर्गत पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक पार पडली होती. शिंदे हे मनसेला रामराम करणार असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. मात्र, त्यांनी आपण कधीही राजसाहेबांची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तरीही काही दिवसांपूर्वी त्यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा पुन्हा सुरू होती. आज त्यांचा नव्या टीममध्ये कुठेच समावेश दिसला नाही. मनसेने निवडणूक आयोगाला जी यादी पाठविली आहे, त्यामध्ये त्यांचे नाव नसल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.

मनसेची कार्यकारिणी
मनसे नेते - बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संजय चित्रे, दीपक पायगुडे, अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे, जयप्रकाश बाविस्कर, प्रमोद (राजू) पाटील, अभिजित पानसे.

सरचिटणीस - मनोज चव्हाण, आदित्य शिरोडकर, परशुराम उपरकर, हेमंत गडकरी, बाबा जाधवराव, प्रकाश भोईर, राजेंद्र शिरोडकर, राजीव चौगुले, यशवंत देशपांडे, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता, अशोक मुर्तडक

Web Title: MNS team shishir shinde politics