esakal | डोंबिवलीकरांनी पालिकेचे घोडं मारलं का?, मनसे करणार आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

डोंबिवलीकरांनी पालिकेचे घोडं मारलं का?, मनसे करणार आंदोलन

डोंबिवली मधून पनवेल, वाशी आणि ठाणे केडीएमटी बस न सोडल्यास मनसे स्टाईलने समाचार घेऊ असा इशारा मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी केडीएमटी प्रशासनाला दिला आहे.

डोंबिवलीकरांनी पालिकेचे घोडं मारलं का?, मनसे करणार आंदोलन

sakal_logo
By
रविंद्र खरात

मुंबईः डोंबिवलीकर नेहमी मालमत्ता कर भरून ही त्यांना नेहमी दुजाभाव का ? कल्याण ला कामगार आणि नागरिक राहतात आणि डोंबिवलीला राहत नाही का ? डोंबिवली मधून पनवेल, वाशी आणि ठाणे केडीएमटी बस न सोडल्यास मनसे स्टाईलने समाचार घेऊ असा इशारा मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी केडीएमटी प्रशासनाला दिला आहे.

मिशन बिगेन अगेन अंतर्गत राज्य शासनाने प्रवास करण्याच्या अटी शिथिल केल्याने केडीएमटीने कल्याण आणि डोंबिवली शहरा अंतर्गत विशेष बसेस सुरू केल्या असून शनिवार 10 ऑक्टोबर पासून कल्याण (उसाटने मार्गे ) पनवेल बस सुरू केल्या असून लवकरच वाशी आणि बेलापूर मार्गावर बसेस सोडणार असल्याची घोषणा केली आहे . या मुद्यावर चांगलीच आक्रमक झाली आहे. एकीकडे खड्डेमय रस्ते आणि रखडलेला पत्रिपुल आणि अन्य रस्त्याच्या कामाने डोंबिवली कर त्रस्त आहेत. वाहतूक कोंडीत तासनतास अडकावे लागते. यात तोडगा काढण्यात पालिका आणि राज्य सरकार यंत्रणा अपयशी ठरली आहे. दुसरीकडे कल्याणमधून केडीएमटी बस सोडता डोंबिवलीमधून का नाही असा सवाल मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी केला आहे.

अधिक वाचाः  राज्य शासनाच्या धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार असाधारण रजा

मनसेचा सवाल

मग, डोंबिवलीहून पनवेल, वाशी, ठाणे बस सेवा का सुरू करत नाही...?
सर्व बस कल्याण वरून सोडणार मग डोंबिवलीकरांनी काय फक्त बसच्या लाईनीत उभे राहायचे का....?
कल्याण आणि डोंबिवली या दोन शहरांमध्ये असा दुजाभाव का करते कल्याण-डोंबिवली महानगरपालिका...?
डोंबिवली, पनवेल-वाशी-ठाणे बससेवा सुरू झाली पाहिजे. असा सवाल केला आहे.

वाट पाहू कल्याण मधून बसेस सुरू केल्या आणि डोंबिवली मधून बसेस न सोडल्याने मनसे स्टाईलने समाचार घेऊ - मनसे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम 

अधिक वाचाः  राजकारणात विरोधकांचे चारित्र्यहनन, संजय राऊतांचा अमित शहांवर निशाणा

मिशन बिगेन अगेन अंतर्गत केडीएमटी बसेस हळूहळू रस्त्यावर धावतील , डोंबिवली मधून पनवेल बसेस जात नव्हत्या मात्र कल्याण वाशी प्रमाणे डोंबिवली वाशी बस सूरु होईल त्याची तयारी सुरू असल्याची माहिती केडीएमटी व्यवस्थापक मिलिंद धाट यांनी दिली.

-----------------------

(संपादनः पूजा विचारे)

MNS will agitate against Kalyan Dombivali MNS City president Rajesh Kadam