Vidhan Sabha 2019 : मनसे आशिष शेलार यांच्या विरोधात निवडणूक लढवणार नाही?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 October 2019

शेलार यांनी राज यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत संतापाचं वातावरण होतं. असं असतानाही वांद्रे पश्चिम मतदारसंघातून मनसे निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट दिसत आहे.

मुंबई : राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची मैत्री सर्वांनाच माहिती आहे. मात्र मधल्या काळात शेलार यांनी राज यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत संतापाचं वातावरण होतं. असं असतानाही वांद्रे पश्चिम मतदारसंघातून मनसे निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट दिसत आहे.

Vidhan Sabha 2019 : मनसेला मोठा धक्का; नांदगावकर शिवसेनेत

मनसेचे मुंबई पश्चिम उपनगर सचिव अल्ताफ खान हे गेल्या काही महिन्यांपासून वांद्रे पश्चिम विधानसभेतून निवडणूक लढवणार, असे स्पष्ट संकेत होते. त्यादृष्टीने ते कामालाही लागले होते. प्रत्यक्षात मात्र उमेदवार म्हणून त्यांचं नाव मनसेच्या दोन्ही याद्यांमध्ये अद्याप जाहीर झालेलं नाही. 

Vidhan Sabha 2019 : ठाण्यात आता मनसे वापरणार शिवसेनेचं 'दिघे कार्ड'

आशिष यांच्या मैत्रीसाठी राज यांनी वांद्रे पश्चिममध्ये निवडणूक न लढण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेतल्याची चर्चा आज राजगड कार्यालयात सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS will not give candidate against Ashish Shelar in Bandra for Maharashtra vidhansabha 2019