मनसेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण, भाजप आमदाराची मागायला लावली माफी; व्हिडीओ व्हायरल झाल्यानं खळबळ

भाजप आमदार महेश बालदी यांच्या विरोधात बोलल्यानं मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण करत माफी मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओसुद्धा व्हायरल होत असून पोलिसात तक्रार करण्यात आलीय.
MNS Worker Assaulted for Criticising BJP MLA Mahesh Baldi

MNS Worker Assaulted for Criticising BJP MLA Mahesh Baldi

Esakal

Updated on

मनसेच्या पदाधिकाऱ्याला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना उरणमध्ये घडलीय. गुरुवारी रात्री ही घटना घडली असून यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालंय. भाजप आमदार महेश बालदी यांच्या विरोधात बोलल्यानं माफी मागायला लावल्याचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मनसे कार्यकर्त्याला त्याच्या आईसमोरच मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com