केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी काल थेट राज ठाकरे यांना आव्हान देत मराठी बोलणार नाही असं जाहीर केलं होतं. मात्र, अशाप्रकारे आव्हान देणं हे त्यांना चांगलं महागात पडलं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईमधील केडिया यांच्या ऑफिसची तोडफोड केली आहे. संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी केडिया यांच्या ऑफिसवर दगडफेक केली.