'आयडॉल'च्या परीक्षांसाठी विना टेंडर कंत्राट दिल्याचा मनविसेनेचा गंभीर आरोप; कंपनीवर कारवाई करण्याची मागणी

तुषार सोनवणे
Tuesday, 6 October 2020

बंगळूर येथील या कंपनीला ऑनलाईन परीक्षांचे कंत्राट कोणतीही टेंडर प्रक्रिया न करताच दिला गेला. असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे.

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल विभागाच्या ऑनलाइन परीक्षा पार घेण्यासाठी 'लिटील मोर इनोवेशन लॅब' या खासगी कंपनीची नेमणूक केली. ही कंपनी महाराष्ट्रातील नाही. तसंच महाराष्ट्रात या कंपनीचे कामही नाही. तरी बंगळूर येथील या कंपनीला ऑनलाईन परीक्षांचे कंत्राट कोणतीही टेंडर प्रक्रिया न करताच दिला गेला. असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे. तसेच लिटील मोर या कंपनीची एकच हेल्पलाइन सुरू आहे. तीसुद्धा हिंदी आणि इंग्रजीत आहे. त्यामुळे मदतीसाठी खूप वेळ वाट पाहावी लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितली आहे.

मुंबईत रेस्टॉरंट्स सुरू; पण मद्यविक्रीसाठी वेळ काय?

आयडॉल परिक्षेचा पहिला पेपर शनिवारी पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली आहे. या परीक्षेचे विद्यापीठांमार्फत पुन्हा नियोजन करण्यात आले आहे. या कंपनीला प्रत्येक विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेमागे 19 रुपये इतका फायदा होणार असल्याची माहिती विद्यापीठाने मनविसेच्या शिष्ठमंडळाला दिली. राज्यातील अनेक तांत्रिक कंपन्या ही परिक्षा पार पाडण्यासाठी अर्ध्या शुल्कात तयार असताना, अनुभव नसलेल्या बंगळूरूतील कंपनीला विनाटेंडर काम देण्यात आल्याबाबत मनविसेने सवाल उपस्थित केला आहे.

दोन्ही राजे नवी मुंबईत एकत्र येणार; उदयनराजे आणि संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली ठरणार मराठा आरक्षणाची रणनिती

शनिवारी झालेल्या परीक्षेत किती विद्यार्थी बसले होते? किती विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणामुळे परीक्षा देता आली नाही? यासंबधी माहितीही कंपनीकडून मिळत नाही. विद्यापीठांच्या प्रशासनाकडूनही माहिती मिळत नाही. कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कंपनीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी, मनविसेने केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mnvs serious allegation of awarding contract without tender for Idol exams in mumbai university