ठाणेकरांनो जपून! मोबाईल चोरीचे सत्र सुरूच आहे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

ठाणे : ठाण्यात दररोज मोबाईल चोरीचे सत्र सुरु असून धावत्या रिक्षात दुचाकीवरून आलेले चोरटे महागडे मोबाईल हिसकावून धूम ठोकत आहेत. सोमवारी (ता.24) एकाच दिवशी दोघी महिलांचे तब्बल 46 हजारांचे दोन महागडे मोबाईल पळवल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी कोपरी आणि नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

ठाणे पश्चिमेकडील रघुनाथ नगर येथील 23 वर्षीय तरुणी सोमवारी रात्री नोकरीवर जाण्यासाठी तीन हात नाका येथून ऑटो रिक्षाने निघाली होती. तेव्हा फोनवर बोलत असताना पावणे दहा वाजण्याच्या सुमारास कोपरी पुलावर रिक्षाच्या शेजारून जात असलेल्या दोघा दुचाकीस्वारानी त्यांचा 20 हजारांचा आयफोन-6 हा मोबाईल हिसकावून धूम ठोकली.

तर दुसऱ्या घटनेत उपचार करून पतीसमवेत दुचाकीवरून कळवा, पारसिकनगर येथील कीर्ती हाळदे घरी येत होत्या. तेव्हा तीन हात नाका सिग्नलला औषधे खरेदी करण्यासाठी पती दुकानात गेले. दुचाकीवर मोबाईल ठेवून वाट पाहत असलेल्या कीर्ती यांचा 25 हजार 990 रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने पळवला. याप्रकरणी नौपाडा पोलिसात मंगळवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Web Title: Mobile theft on the rise in Thane for past few days