esakal | दिलासा! मोडकसागर, तुळशी, विहारनंतर तानसा तलावही ओव्हरफ्लो; मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली
sakal

बोलून बातमी शोधा

दिलासा! मोडकसागर, तुळशी, विहारनंतर तानसा तलावही ओव्हरफ्लो; मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली

मुंबईला पाणी पुरवठा करणार तानसा तलावही आज संध्याकाळी ओसंडून वाहू लागला आहे.यापुर्वी मोडकसागर,तुळशी आणि विहार हे तीन तलाव भरले होते.तर,मध्य वैतरणा तलावाही सकाळ पर्यंत 93 टक्के भरला होता.

दिलासा! मोडकसागर, तुळशी, विहारनंतर तानसा तलावही ओव्हरफ्लो; मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली

sakal_logo
By
समीर सुर्वे


मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणार तानसा तलावही आज संध्याकाळी ओसंडून वाहू लागला आहे.यापुर्वी मोडकसागर,तुळशी आणि विहार हे तीन तलाव भरले होते.तर,मध्य वैतरणा तलावाही सकाळ पर्यंत 93 टक्के भरला होता.

मरणासन्न स्थिती! इव्हेंट मॅनेजमेंट इंडस्ट्रीवरही बेरोजगारीचे काळे ढग;  कार्यक्रमाअभावी लाखो तरुण आर्थिक संकटात

मोडकसगार तलावात गुरुवारी सकाळी 1 लाख 37 हजार 815 दशलक्ष लिटर साठा होता.तलावाच्या एकूण क्षमतेच्या 95 टक्के पाणीसाठा होता.दिवसभरात साठ्यात पाच टक्‍क्‍यांनी वाढ झाली असून आता 1 लाख 45 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे.संध्याकाळी 7 वाजल्याच्या सुमारात तानसा तलाव ओसंडून वाहू लागला. तलाव क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने मुंबई महानगर पालिकेने 10 टक्के पाणी कपात कमी केली आहे.5 ऑगस्ट पासून मुंबईत 20 टक्के पाणी कपात लागू होती.तर,उद्या पासून ही 10 टक्के लागू राहाणार आहे.सध्या तलावांमध्ये 87.20 टक्के पाणीसाठा आहे.वर्षभर सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते.गुरुवार सकाळ पर्यंत 12 लाख 62 हजार 119 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा होता.

ऑस्ट्रेलियातील गणेशभक्तही बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज, उत्सव मात्र साधेपणाने

गुरुवार सकाळचा पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

  • -अप्पर वैतरणा - 163299
  • -मोडकसागर - 128925
  • -तानसा - 137815
  • - मध्य वैतरणा - 181741
  • -भातसा - 614595
  • - विहार - 27698
  • -तुळशी - 8046 

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top