Riya Ahir: सतत धमक्या आणि शिवीगाळ, मुंबई पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रिया अहिरचा ऑनलाईन छळ; सायबर सेलकडे धाव

Model Riya Ahir Cyber Cell Complaint: मुंबई पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रिया अहिरचा ऑनलाईन छळ केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रियाने सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे.
Model Riya Ahir Cyber Cell Complaint

Model Riya Ahir Cyber Cell Complaint

ESakal

Updated on

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत सुरु असणाऱ्या आंदोलनाचे पडसाद मुंबईतही पडत होते. मुंबईतील दादर येथे शिवाजी पार्कमध्ये आंदोलन केले जात असताना यावेळी रिया अहिर या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना रिया अहिर (२७) पोलिसांच्या व्हॅनसमोर ठामपणे उभी राहिली. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र पसरताच रिया रातोरात आंदोलनाचा सर्वात लोकप्रिय चेहरा बनली. मात्र एकीकडे वाहवाह केली जात असताना दुसरीकडे तिचे ट्रोलिंग आणि मानसिक छळ केले जात असल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com