esakal | तळोजा MIDC तील कंपनीला आग; अग्निशमन दलातील जवानाचा गुदमरून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

तळोजा MIDC तील कंपनीला आग; अग्निशमन दलातील जवानाचा गुदमरून मृत्यू

तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखान्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना ऐका अग्निशमन दलाच्या जवानाचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री 12 च्या सुमारास घडली आहे

तळोजा MIDC तील कंपनीला आग; अग्निशमन दलातील जवानाचा गुदमरून मृत्यू

sakal_logo
By
दीपक घरत

पनवेल - तळोजा औद्योगिक वसाहतीतील कारखान्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवताना ऐका अग्निशमन दलाच्या जवानाचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री 12 च्या सुमारास घडली आहे. बाळू देशमुख असे मृत जवानाचे नाव असून 32 वर्षीय देशमुख अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन केंद्रात फायर मन या पदावर कार्यरत होते.  देशमुख यांच्या पश्चात मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या त्यांच्या पत्नी व 4 वर्षीय मुलगा असा परिवार असून देशमुख यांच्या निधनाने अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांमध्ये शोक भावना पसरली आहे.

हेही वाचा - 'राहुल गांधींवर केलेल्या टीकेबाबात यशोमती ठाकूर कडाडल्या; महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर

तळोजा औद्योगिक वसाहती मधील भूखंड क्रमांक जे 39 वर असलेल्या मोदी केमिकल या कारखान्यास शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाच्या जवानांसह पनवेल अग्निशमन दल, कळंबोली अग्निशमन दल, खारघर अग्निशमन दल, नवीन पनवेल अग्निशमन दल तसेच अंबरनाथ अग्निशमन दलाचे जवान घटनस्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. कारखान्यात असलेल्या रसायनाच्या साठ्यामुळे आगीची तीव्रता वाढल्याने जवानांनी केलेल्या प्रयत्नांना नंतर देखील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना जवळपास 11 तासापेक्षा जास्तचा कालावधी लागला आहे.

हेही वाचा - रिपब्लिक वाहिनीविरोधात तक्रार घेण्याविषयी अर्ज; मुंबई पोलिसांची बदनामी केल्याचा आरोप

गुदमरल्याने अत्यवस्थ जवान रुग्णालयात दाखल
आगीच्या भडक्यात रासायनिक पदार्थाच्या झालेल्या धुरामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांत असलेल्या 4 ते 5 जवानांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने जवानांना उपचारासाठी नजदिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तळोजा औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाचे प्रमुख दीपक दोरुगडे यांना देखील श्वसनाचा त्रास जाणवला आहे.

Modi chemical factory fire in taloja midc Firefighter suffocated to death

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )