सीएएविरोधी निदर्शनास मोदी-मोदीने प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

मुंबई ः सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात आणि समर्थनार्थ देशभरात फेऱ्या सुरु असतानाच ते आता थेट क्रिकेटच्या मैदानापर्यंत पोहचले आहे.

महत्वाची बातमी कौटुंबिक कारणांमुळे शर्मिला ठाकरेंनी टाळली मुख्यंत्र्यांची भेट?

मुंबई ः सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात आणि समर्थनार्थ देशभरात फेऱ्या सुरु असतानाच ते आता थेट क्रिकेटच्या मैदानापर्यंत पोहचले आहे.

महत्वाची बातमी कौटुंबिक कारणांमुळे शर्मिला ठाकरेंनी टाळली मुख्यंत्र्यांची भेट?

मुंबईतील वानखेडे मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय सामना सुरू असताना काही प्रेक्षकांनी अचानक आपले शर्ट काढून आतील टी-शर्टवर "सीएए' आणि "एनआरसी'विरोधी संदेश दाखवले. आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली. त्यांना सुरक्षा यंत्रणा ताब्यात घेत असताना मोदी - मोदी अशा घोषणाही देण्यात आल्या. यावेळी काहींनी इंडिया - इडिया अशा घोषणा दिल्याचेही ट्‌वीट झाले आहे. 
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याच्यावेळी काही प्रेक्षक "नो सीएए' आणि "नो एनआरसी' असा संदेश असलेले टी-शर्ट परिधान करून आले होते.

हे देखील वाचा सावधान! प्रोटिन्स सप्लिमेंट करतेय बॉडीची बिघाडी

या टी-शर्टमुळे प्रवेशद्वारावरच अडवले जाऊ शकते, या शक्‍यतेने आंदोलनकर्त्यांनी टी-शर्टवर शर्ट परिधान केले होते. भारताचा डाव सुरू असताना या प्रेक्षकांनी शर्ट काढून टी-शर्टवरील संदेश दाखवण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे विरोध होऊ शकतो याचा अंदाज आल्यामुळे कोणीही काळे टी-शर्ट किंवा शर्ट परिधान करून स्टेडियममध्ये येऊ नये, अशी सूचना दिल्याची चर्चा होती; मात्र ती अफवा असल्याचे मुंबई पोलिस आणि मुंबई क्रिकेट संघटनेने ट्विटरद्वारे स्पष्ट केले. केवळ काळे फलक घेऊन स्टेडियममध्ये जाण्यास मनाई करण्यात आली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. 
Modi-Modi responds to CAA protests


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi-Modi responds to CAA protests